एक्स्प्लोर

Cyclone Tauktae महाराष्ट्रात धडकणार नाही, पण सर्वाधिक परिणाम सिंधुदुर्ग रत्नागिरीत जाणवेल : डॉ. शुभांगी भुते

Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार नाही, अशी माहिती हवामान विभागाच्या वैज्ञानिक डॉ. शुभांगी भुते यांनी दिली आहे. मात्र चक्रीवादळाचा परिणाम सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात जाणवेल, असंही त्यांनी सांगितलं.

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेलं तोक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae) तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परंतु यात दिलासादायक बाब म्हणजे हे वादळ महाराष्ट्रात धडकणार नाही. परंतु सर्वाधिक परिणाम सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जाणवेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी भुते यांनी दिली. 

डॉ. शुभांगी भुते यांच्या माहितीनुसार, "येत्या 24 तासात तोक्ते चक्रीवादळ कोकणाच्या जवळ येईल. यावेळी ताशी 60 ते 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यावेळी पाऊसही पडेल. मात्र  महाराष्ट्रात कुठेच वादळ धडकणार नाही. जीवितहानी होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. आजप्रमाणेच उद्याही मुंबईत ढगाळ वातावरण असेल, शिवाय पावसाचीही शक्यता आहे. गोवा किंवा कोकणजवळ वादळ असेल तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात वेगाने वार वाहण्याची शक्यता आहे. मागील वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे या वादळाचा मुंबई आणि महाराष्ट्रात प्रभाव नसेल."

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्यात मासेमारांना अलर्ट केले आहे. हे वादळ गोव्यापासून 350 किलोमीटर अंतरावर आहे. 24 तासात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत येईल. चक्रीवादळ तयार झाल्यानंतर ते किनारपट्टीपासून 350-400 किमी दूर असेल. सर्वाधिक परिणाम सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला जाणवेल. ताशी 60 ते 70 प्रति वेग असलेल्या वाऱ्यामुळे कोकण आणि गोव्यातील झाडे तसंच कच्च्या घरांची पडझड होईल.  16 तारखेला रायगड, मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी परिणाम जाणवतील. तोक्ते चक्रीवादळ 18 तारखेला विरावळ/पोरबंदर ते नलिया या गुजरातमधील किनारपट्ट्यांमध्ये धडकेल, अशी माहिती डॉ. भुते यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांकडून मनुष्यबळ आणि साधनसामुग्री तयार ठेवण्याचे आदेश
अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (14 मे) ऑनलाईन बैठक घेऊन आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसंच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावं, अशा सूचनाही प्रशासनाला दिल्या. तोक्ते चक्रीवादळाचा प्रभवा विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या जाणवणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज राहावं आणि मनुष्यबळ तसंच साधनसामुग्री तयार ठेवावी असंही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget