एक्स्प्लोर

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर श्रेयांक पद्धतीसह टक्केवारीही असणार

अनेकदा कोणत्याही प्रवेश परिक्षेवेळी किंवा नोकरीवेळी नुसत्या श्रेयांक गुणपत्रिकेवर असल्याने अडचणी निर्माण होत होत्या. त्या अडचणी आता या टक्केवारी सुद्धा गुणपत्रिकेत असल्याने येणार नाही.

 मुंबई : विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर श्रेयांक पद्धतीसह (Cumulative Grade Point Average) टक्केवारी नमूद असणार आहे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
विविध विद्यापीठाची त्याशिवाय राज्यतल्या विविध शैक्षणिक संस्थाची श्रेयांक पद्धत ही वेगळी असते शिवाय राज्यातील स्वायत्त ( ऑटोनोमस) कॉलेजमध्ये देखील श्रेयांक पद्धत ही ठरवून दिलेली असते व त्यानुसार निकाल दिला जातो. यामध्ये काही विद्यापीठ प्रत्येक सेमिस्टरच्या गुणपत्रिकेत ग्रेड सोबत टक्केवारी सुद्धा नमूद करतात तर काही विद्यापीठ किंवा स्वायत्त शिक्षण संस्था या टक्केवारी नमूद न करता पॉइंटर्स नमूद करून शेवटी ग्रेड दिले जातात. त्यामुळे पॉइंटर्स त्यासोबत ग्रेड आणि एकूण मार्क याची टक्केवारी काढले जाऊन ग्रेड सोबत ते गुणपत्रिकेत दिले जाणार आहेत.
या नव्या निर्णयावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यातील विविध विद्यापीठांमार्फत गुण देताना विभिन्न पद्धतींचा अवलंब केला जातो. यामुळे इतर ठिकाणी प्रवेश घेताना आणि नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावेळी महाविद्यालयाला आणि नियुक्ती प्राधिकरणाला विद्यार्थ्यांच्या टक्केवारीची आवश्यकता असते. अकृषी विद्यापीठांद्वारे देण्यात येणाऱ्या पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे गुण देण्याच्या पद्धतीमध्ये एकसारखापणा असावा यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून श्रेयांक पद्धतीसह गुणपत्रिकेवर टक्केवारी नमूद करण्यात यावी'.
याशिवाय आता पुढील वर्षांपासून पदवी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक सत्राच्या गुणपत्रिकेवर ग्रेड तर दिलेच जाणार आहेत. त्याशिवाय प्रत्येक विषयांचे मार्क्स त्या सर्व मार्कांची एकूण काढून टक्केवारी देखील दिली जाणार आहे. फक्त तृतीय वर्ष किंवा द्वितीय तृतीय वर्ष मिळून निकाल गुणपत्रिकेत ना दाखवता संपूर्ण पदवीच्या मार्कांची ऍग्रिगेट टक्केवारी आणि ग्रेड यामध्ये नमूद केली जाईल.
त्यामुळे अनेकदा कोणत्याही प्रवेश परिक्षेवेळी किंवा नोकरीवेळी नुसत्या श्रेयांक गुणपत्रिकेवर असल्याने अडचणी निर्माण होत होत्या. त्या अडचणी आता या टक्केवारी सुद्धा गुणपत्रिकेत असल्याने येणार नाही. अगदी दहावी आणि बारावी बोर्डाचे गुणपत्रक ज्या प्रमाणे असते त्याचप्रकारे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे हे गुणपत्रक असतील. जेणेकरून राज्यतल्या विद्यापीठातील गुण देण्याच्या पद्धतीमध्ये एकसारखेपणा येईल आणि उमेदवारांच्या गुणपत्रिकेहुन त्याची योग्य पद्धतीने विविध पातळीवर निवड करण्यास सहज शक्य होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest: दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Jalgaon Crime: पैशांचा वाद विकोपाला गेला, 21 वर्षीय भूषणचा काटा काढला; नंतर फुटपाथवर बॉडी फेकली अन्...; जळगाव हादरले!
पैशांचा वाद विकोपाला गेला, 21 वर्षीय भूषणचा काटा काढला; नंतर फुटपाथवर बॉडी फेकली अन्...; जळगाव हादरले!
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Nagpur BJP: बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
Nana Patekar: ‘आग लागण्याची वाट पाहायची का?’ जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाना पाटेकर का संतापले होते? नेमकं काय घडलं होतं?
‘आग लागण्याची वाट पाहायची का?’ जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाना पाटेकर का संतापले होते? नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी चढाओढ; कुठे थेट लढत, कुठे बंडखोरी, किती आले उमेदवारी अर्ज अन् किती ठरले वैध, जाणून घ्या सविस्तर
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी चढाओढ; कुठे थेट लढत, कुठे बंडखोरी, किती आले उमेदवारी अर्ज अन् किती ठरले वैध, जाणून घ्या सविस्तर
Embed widget