एक्स्प्लोर

Cruise drugs case | क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्चित कुमारसह नऊ आरोपींना जामीन मंजूर

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्चित कुमारसह नऊ आरोपींना जामीन मंजूर. 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अटीशर्तींसह सुटका करण्यात आली आहे. आयोजकांसह नुपूर सतीजा आणि गोमित चोप्रा यांचाही यात समावेश.

मुंबई : कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खानसह तिघांना मुंबई उच्च न्यायालयाकडनं जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर शनिवारी या प्रकरणातील अन्य नऊ आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टाकडनं जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकूण 20 आरोपींपैकी 14 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया या आलिशान क्रुझवर एनसीबीकडून 2 ऑक्टोबरला छापेमोरी करण्यात आली होती. त्यावेळी बॉलिवूडचा किंगखान शाहरूखचा मोठा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचासह एकूण 20 जणांना अटक करण्यात आली. यापैकी अवीन साहू आणि मनीष राजगरिया यांना मंगळवारी विशेष न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. तर मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर केला.

त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी याचप्रकरणी आर्चित कुमारसह नऊ जणांना जामीन मंजूर केला. त्यात नुपूर सतीजा, गोमित चोप्रा यांनाही जामीन मिळाला असून त्यांच्यासोबत क्रुझवर इव्हेंट आयोजित करणाऱ्या कॅनेप्लस ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या इव्हेंट कंपनीचे संचालक गोपालजी आनंद आणि समीर सेहगल आणि त्यांचे दोन कर्मचारी मानव सिंघल आणि भास्कर अरोरासह श्रेयर नायर आणि इश्मित चढ्ढा यांनाही आता जामीन मिळालेला आहे. या सर्वांना 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

हा खटला लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी तपासात सहकार्य करावं, पुराव्यांशी छेडछाड करू नये, आणि जामीनावर असताना असा गुन्हा पुन्हा करू नये, या प्रकरणात आरोपपत्र दाखल होईपर्यंत सर्व आरोपींना दर आठवड्याला एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीसह अन्यकाही शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah Player of the Series : फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
Nashik Crime News : नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
Anjali Damania : बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
Santosh Deshmukh Case : मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Protest : सकल मराठा समाजाचा जनआक्रोश मोर्चा, लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाIndia Vs Australia : पाचव्या कसोटीसह ऑस्ट्रेलियानं मालिकाही 3-1 नं जिंकलीAnjali Damania News : 'धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ सुरु'- दमानियाSantosh Deshmukh News : संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाचा मोर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah Player of the Series : फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
Nashik Crime News : नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
Anjali Damania : बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
Santosh Deshmukh Case : मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
Video : माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
Anjali Damania : धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ; सीएम फडणवीस, रश्मी शुक्लांची वेळ मागितली, अंजली दमानिया आज कोणता गौप्यस्फोट करणार?
धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ; सीएम फडणवीस, रश्मी शुक्लांची वेळ मागितली, अंजली दमानिया आज कोणता गौप्यस्फोट करणार?
Nashik Crime : गुजरातमधील बहीण भावाचा सराफा दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला; पोलिसांकडून पर्दाफाश
गुजरातमधील बहीण भावाचा सराफा दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला; पोलिसांकडून पर्दाफाश
Panipuri GST Notice : पाणीपुरीवाल्याचा ऑनलाईन पेमेंटचा आकडा पाहून जीएसटी विभागाला कडाक्याच्या थंडीत दरदरुन घाम सुटला! थेट नोटीस धाडली
पाणीपुरीवाल्याचा ऑनलाईन पेमेंटचा आकडा पाहून जीएसटी विभागाला कडाक्याच्या थंडीत दरदरुन घाम सुटला! थेट नोटीस धाडली
Embed widget