Crime News: दोन दहशतवाद्यांचा मुंबईत घातपाताचा होता डाव, सगळी तयारीही झालेली, आफताब अन् सूफियान दिल्लीवरुन निघाले अन्...
Crime News: दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयसीसच्या दोन दहशतवाद्यांचा मुंबईत घातपाताचा डाव होता.

Crime News: दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयसीसच्या दोन दहशतवाद्यांचा (ISIS Terrorist Arrest) मुंबईत घातपाताचा डाव होता. दिल्ली रेल्वे स्टेशनवरुन मुंबईला निघण्यापूर्वीच आफताब आणि सूफियान या दोन दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली.
आफताब आणि सूफियान या दहशतवाद्यांचा मुंबईत घातपाताचा डाव होता. हरियाणातल्या मेवातमधूनमधून स्फोटके, शस्त्रास्त्रे देखील खरेदी केली होती. मात्र दिल्ली रेल्वे स्टेशनवरुन मुंबईला निघण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. आफताब आणि सूफियान मुंबईतच राहणारे आहेत. दोघांकडून 3 पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात काडतूस जप्त करण्यात आली आहेत.
#WATCH | Delhi Police Special Cell busted a Pan-India terror module and arrested five terrorists identified as Ashhar Danish, Sufiyan Abubakar Khan, Aaftab Ansari, Huzaifa Yaman and Kamran Qureshi
— ANI (@ANI) September 11, 2025
A large quantity of materials and precursors for making IED have been seized from… https://t.co/uAcHkQ8r58 pic.twitter.com/zoCOqCkCJK
आफताब आणि सुफियान हे मुंबईचे रहिवासी-
आफताब आणि सुफियान हे मुंबईचे रहिवासी आहेत. स्पेशल सेलने मुंबईतील त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवरही छापे टाकले आहेत. तिथून शस्त्रे आणि आयईडी बनवण्याचे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. सर्व संशयित दहशतवादी सोशल मीडिया अकाउंटद्वारे पाकिस्तानस्थित हँडलर्सच्या संपर्कात होते.
दिल्ली पोलिसांकडून 5 दहशतवाद्यांना अटक-
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि केंद्रीय एजन्सींनी अनेक राज्यांमध्ये छापे टाकून ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश करत 5 दहशतवाद्यांना अटक केली. संशयित दहशतवाद्यांकडून आयईडी बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, 5 दहशतवाद्यांपैकी दोन दिल्लीचे आणि प्रत्येकी एक मध्य प्रदेश, तेलंगणातील हैदराबाद आणि झारखंडमधील रांची येथील आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने संपूर्ण भारतातील दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि अशर दानिश, सुफियान अबुबकर खान, आफताब अन्सारी, हुजैफा यमन आणि कामरान कुरेशी अशी पाच दहशतवाद्यांना अटक केली.
अशरफ दानिश भारतातून चालवत होता दहशतवादी मॉड्यूल-
अशरफ दानिश भारतातून दहशतवादी मॉड्यूल चालवत होता. रांची येथील त्याच्या लपण्याच्या ठिकाणावरून एक देशी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे, हायड्रोक्लोरिक अॅसिड, नायट्रिक अॅसिड, सल्फर पावडर, तांब्याचे पत्रे, बॉल बेअरिंग्ज, स्ट्रिप वायर्स, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, संशयित दहशतवादी भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत होते. त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून भारतातील तरुणांना कट्टरतावादी बनवून त्यांच्या नेटवर्कमध्ये भरती केले. सांप्रदायिक द्वेष पसरवणे आणि धार्मिक सलोखा बिघडवणे या उद्देशाने दहशतवादी गट अनेक ऑनलाइन गट देखील चालवत होता.

























