Mumbai Corona Update : मुंबईतील रुग्णसंख्येत आजही वाढ; 85 नव्या रुग्णांची नोंद
Mumbai Corona Update : मुंबईतील आज नव्याने 85 रुग्ण आढळले असून एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
Mumbai Corona Update : मुंबईत (Mumbai) आज आढळलेली नव्या कोरोनारुग्णांची (Mumbai Corona Update) संख्या ही काहीशी अधिक असल्याने नागरिकांसह पालिकेला विचार करण्याची वेळ आली आहे. आज मुंबईत नवे 85 कोरोनाबाधित आढळले आहेत. काल ही संख्या 34 होती तर रविवारी ही संख्या 55 इतकी होती. पण आज थेट 85 नवे बाधित आढळल्याने चिंता वाढली आहे. याशिवाय मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 390 इतकी झाली आहे. मुंबई पालिका क्षेत्रात 85 कोरोनाबाधित आढळले असून आसपासच्या क्षेत्राचा विचार करता, ठाणे पालिका क्षेत्रात आठ, नवी मुंबई पालिका क्षेत्रात पाच, पनवेल पालिका क्षेत्रात तीन, रायगडमध्ये दोन तर वसई-विरार आणि ठाणे ग्रामीणमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
राज्यात 137 नवे कोरोनाबाधित
राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Update) चढ उतार होताना दिसत आहे. सोमवारी राज्यात 137 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 660 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 108 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज तीन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,27, 551 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 99, 13, 435 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
- Corona Virus : कोरोनामुळं शुक्राणूंवर परिणाम! मुलं होण्यास येऊ शकतात अडचणी; अभ्यासातून निष्कर्ष
- WHO ची Covaxin च्या पुरवठ्यावर बंदी, जाणून घ्या भारत बायोटेक काय म्हणाले?
- Corona XE Variant : मुंबईत कोरोनाचा नवा व्हेरियंट; WHOकडून दिलासा देणारी माहिती