Mumbai Corona Update : मुंबईत मागील काही दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या 643 नवे रुग्ण, तर 1402 जणांची कोरोनावर मात
Mumbai Corona Update : मागील काही दिवसांतील सर्वांत कमी रुग्णसंख्या मुंबईत आज आढळली आहे. शनिवारी मुंबईत 643 कोरोना रुग्ण आढळले होते.
Mumbai Corona Update : मागील काही दिवसांच्या तुलनेत शनिवारी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. शनिवारी मुंबईत 643 कोरोना रुग्ण आढळले आहेत मागील काही दिवसांच्या तुलनेत ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी मुंबईत 643 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 402 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 10,24,991 इतकी झाली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 6 हजार 367 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 666 दिवसांवर आला आहे. मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.10% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत कोरोनामुळे चार जणांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे.
सध्या मुंबईतील 3 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 643 रुग्णांपैकी 92 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 37 हजार 192 बेड्सपैकी केवळ 1 हजार 558 बेड वापरात आहेत.
हे ही वाचा :
- Omicron Origin : खरंच उंदरातून माणसांमध्ये आला ओमायक्रॉन?, अभ्यासातील दावा
- कोरोनाकाळात रुग्णांकडून घेतलेले जास्तीचे पैसे परत न करणाऱ्या रुग्णालयांची नोंदणी रद्द करणार, जिल्हा शल्यचिकित्सकांचा इशारा
- Trending : मला कोरोना झालाय, रजा हवी, गंडवणाऱ्या महिलेला बॉसकडून मोठी शिक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha