Mumbai Corona Update : मुंबईत शुक्रवारी 48 कोरोनाबाधितांची नोंद, एकही मृत्यू नाही
Mumbai Corona Update : मुंबईत नव्या कोरोनाबाधितांची संख्या स्थिरावली आहे. मागील 24 तासांच 48 नवे कोरोनाबाधित आढळले असून 54 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोनारुग्णांच्या (Mumbai Corona Update) संख्येत आज कालच्या तुलनेत अधिक घट पाहायला मिळाली. आज 48 नवे कोरोनाबाधित आढळले असून काल ही संख्या 73 होती. त्यामुळे आज पुन्हा रुग्णसंख्या 50 च्या आत आल्याने पालिका प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज एका मृत्यूची नोंद देखील झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 48 कोरोनाबाधित आढळले असून 54 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील कमी झाली असून आज ही संख्या 317 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 48 रुग्णांपैकी केवळ एका रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 28 हजार 350 बेड्सपैकी केवळ 74 बेड सध्या वापरात आहेत.
राज्यात 171 नवे कोरोनाबाधित
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या बऱ्यापैकी आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. राज्यात आज 171 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 394 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. याशिवाय राज्यात आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,22, 754 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 88, 85, 405 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
हे ही वाचा -
- Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 237 रुग्णांची नोंद तर रिकव्हरी रेट 98.10 टक्के
- Coronavirus Update : कोरोनाची चौथी लाट येणार का? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात...
- Mumbai Local Train : मुंबईत लोकल प्रवासासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस अनिवार्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha