(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Corona Update : मुंबईतील रुग्णसंख्येतील घट कायम, 26 नव्या रुग्णांसह 49 जण कोरोनामुक्त
Mumbai Corona Update : मुंबईतील आजही 30 पेक्षा कमी नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तसंच एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनारुग्णांची(Mumbai Corona Update) आटोक्यात आलेली संख्या आजही कायम आहे. आज देखील 30 हून कमी कोरोनाबाधित आढळल्याने पालिका प्रशासनाला (Mumbai BMC) काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 26 कोरोनाबाधित आढळले असून 49 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 275 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 28 रुग्णांपैकी पाच रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेकडील 26 हजार 495 बेड्सपैकी केवळ 32 बेड सध्या वापरात आहेत.
राज्यात 156 नव्या बाधितांची नोंद
कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या आजही कायम असून आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी राज्यात 156 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय मागील 24 तासांत राज्यात 269 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. ज्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.11% एवढे झाले आहे. तसेच आज राज्यात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 % एवढा आहे. देशाचा विचार करता देशात गेल्या 24 तासांत आढळलेल्या 1,581 नवीन रुग्णांमुळे सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 23,913 झाली आहे.
हे ही वाचा -
- COVID Lockdown Anniversary : दोन वर्षापूर्वी कोरोनाचा पहिला लॉकडाऊन; मागे वळून पाहताना भारताने काय गमावलं?
- Coronavirus Update : कोरोनाची चौथी लाट येणार का? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात...
- Mumbai Local Train : मुंबईत लोकल प्रवासासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस अनिवार्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha