Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, 192 नवे कोरोनाबाधित
मुंबईमध्ये सोमवारी 192 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 350 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
Mumbai Corona Update : मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत होणारी घट आजही कायम राहिली आहे. मुंबईत सोमवारी 192 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मुंबईत 192 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 350 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 513 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 1691 दिवसांवर आला आहे. रविवारच्या तुलनेत यामध्ये तब्बल 294 दिवसांची वाढ झाली आहे.
याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर कमी होऊन 0.04% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. तसंच आज नव्याने सापडलेल्या 192 रुग्णांपैकी 26 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 889 बेड्सपैकी केवळ 996 बेड वापरात आहेत.
काळजी घेणं गरजेचं
जागतिक आरोग्य संस्थेने कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं असून ओमायक्रॉननंतर देखील नवा व्हेरियंट येऊ शकतो अशी शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. कोव्हिड 19 तांत्रिक दलाच्या की मारिया वान केरखोव यांनी सावध इशारा देताना, 'आम्ही या विषाणूबद्दल बऱ्याच गोष्टी जाणतो. पण यात अनेक बदल होत असल्याने आम्ही यावर नजर ठेवून आहोत. त्यामुळे नागरिकांनीही काळजी घेणं गरजेचं आहे.'
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Covid19 Vaccine : फायझर लसीच्या पाच वर्षाखालील मुलांवरील वापरासाठी प्रतिक्षा, मंजुरीसाठी अधिक माहिती गरजेची : FDA
- mRNA vaccine : पुण्यात तयार झाली भारताची पहिली मेसेंजर आरएनए कोरोना लस
- Covid19 : सावधान! सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळले कोरोनाचे चार 'गुप्त' प्रकार, धोका वाढण्याची शक्यता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha