Mumbai Corona Update : मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्णवाढीच्या दरात घट
Corona Update : मुंबईमध्ये रविवारी 103 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 165 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
Mumbai Corona Update : मुंबईतील (Mumbai) कमी होणाऱ्या रुग्णसंख्येमुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहेच, पण आज कोरोनारुग्णवाढीच्या दरातही घट झाल्याने नागरिकांसह पालिका प्रशासनाला आणखी दिलासा मिळाला आहे. आज मुंबईत नव्या 103 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर रुग्णवाढीचा दरही थेट 0.01 वर पोहोचला आहे.
मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 103 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 165 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 838 इतकी झाली आहे. मुंबईच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 103 रुग्णांपैकी 16 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 35 हजार 922 बेड्सपैकी केवळ 689 बेड वापरात आहेत.
राज्यात 182 नवे कोरोनाबाधित
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. दैनंदिन कोरोना रुग्ण कमी होत आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 782 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत राज्यात फक्त दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी नवी मुंबई आणि सोलापूरमध्ये कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात इतर ठिकाणी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78,65,298 झाली आहे.
हे ही वाचा :
- Maharashtra Corona Update : रविवारी राज्यात 782 नव्या रुग्णांची नोंद, दोन जणांचा मृत्यू
- New Unlock Guidelines : आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी केंद्राकडून नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी, वाचा नव्या मार्गदर्शक सूचना
- Covid Vaccination : भारतात Covishieldसह अनेक लसी सध्या वापरात, तर 'या' पाच लसींची भारताला प्रतिक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha