एक्स्प्लोर

BMC Covid Scam ? | मुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांनी मुलाच्या कंपनीला दिले; मनसेचा आरोप

मुंबई मधील कोविड सेंटरच्या कामात महापौरांनी पदाचा गैरवापर करत आपल्या मुलाच्या कंपनीला काम दिल्याचा आरोप मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केला आहे. या संदर्भात महापौरांच्या राजीनाम्याची मागणी, मनसेने केली आहे.

मुंबई : मुंबईतील कोविड सेंटरचे काम देण्यात मुंबईच्या महापौरांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या मुलाच्या कंपनीला काम दिले असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. वरळी व इतर जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये लेबर सप्लायचे काम किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया या कंपनीला देण्यात आले असून त्यांचा यामध्ये पूर्वीच्या कामाचा अनुभव तपासला गेला का? कारण या कंपनीच्या ऍडशिनल डिरेक्टर म्हणून महापौरांचे चिरंजीव सरप्रसाद पेडणेकर असल्याच मनसेने समोर आणलं आहे. इतरांना ही टेंडर का मिळाली नाही, कोव्हीड इमर्जन्सी आणि इ टेडरिंगच्या नावाखाली हा घोटाळा बीएमसीकडून करण्यात आला असून याची तक्रार महापालिका लेखापाल, लोकायुक्त, मुख्यमंत्री यांच्याकडे मनसे करणार असल्याचे संदिप देशपांडे यांनी सांगितले. महापौरांच्या मुलाच्या कंपनीला कंत्राट कसे? कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री यांनी वक्तव्य केले की सगळ्यानी सहकार्य करा. पण यामध्ये बीएमसीमधला पक्ष शिवसेना हा भ्रष्टाचारच्या मार्गाने जाताना पाहायला मिळतोय. कोव्हीडचे जम्बो सेंटर उभरण्यात आले, त्यात इमर्जन्सीच्या ई टेडरिंगच्या नावाखाली घोटाळा झाला आहे. ज्यांना ही काम दिली गेली आहे, त्यांना या कामाचा आधी अनुभव आहे का? हे सुद्धा बघितलं गेलेलं नाही. आमच्याकडे अनेक तक्रारी या जम्बो कोव्हिड सेंटर बाबत येत होत्या. किश कोपरपोर्टेट सर्व्हिसेस इंडिया या कंपनीच्या या पर्चेस ऑर्डर आहेत. ही कंपनी कुठली आहे? याबाबत आम्ही माहिती काढली. साइट्स बघितली, कुठलाही अनुभव नाही. Swachh Sarveskshan 2020 : देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसऱ्या स्थानी, इंदूर पुन्हा अव्वल महापौर यांनी तात्काळ राजीनामा; मनसेची मागणी यामध्ये डिरेक्टर मध्ये काही नाव आहेत, या कंपनीच्या नावांमध्ये साईप्रसाद पेडणेकर हे नाव आता सांगायची गरज नाही. महापौरांनी स्वतःच्या मुलाला पदाचा गैरवापर करून हे काम दिल आहे. वरळी व इतर कोविड सेंटर मधील कामंही या कंपनीला दिली आहेत. काही एनजीओची काम सुद्धा दिली आहे. कोव्हीडच्या नावावर हा भ्रष्टाचार झालेला आम्ही विसरणार नाही. महापौर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केलीय. महानगरपालिका लेखपरिक्षक, लोकायुक्त सोबत मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा याबाबत आता आम्ही तक्रार करणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली. महापौरांच्या मुलांनाच कसे काम दिल गेले? याच स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाही. सभागृह सुरू व्हावं, स्थायी समिती बैठक का होऊ शकत नाहीये? व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे का होत नाही? कारण त्याना भीती वाटतीये हे सगळं बाहेर येईल, असाही आरोप संदिप देशपांडे यांनी यावेळी केली. Mumbai Mayor | कंपनीला काम देताना नियम मोडले हे सिद्ध करावं, मुंबईच्या महापौरांचं मनसेला आव्हान

महत्त्वाच्या बातम्या

Free School Bag: आनंदवार्ता! 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Embed widget