एक्स्प्लोर

सचिन वाझेला कोर्टाचा दिलासा! वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईतील खाजगी रूग्णालयात दाखल होण्याची परवानगी

मुंबईतील वोकहार्ट रूग्णालयात सचिन वाझेवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यावेळी वाझेच्या पत्नीला सोबत राहण्याची मुभा. मुंबई सत्र न्यायालयाचे निर्देश.

मुंबई : सचिन वाझेला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईतील खाजगी रूग्णालयात दाखल होण्याची परवानगी गुरूवारी विशेष न्यायालयानं दिली आहे. मुकेश अंबानी यांच्या 'अँटालिया' या निवासस्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बडतर्फ सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेसाठी हा एक दिलासाच म्हणावा लागेल.

विशेष एनआयए न्यायालयाच्या परवानगीनंतर वैद्यकिय उपचारांसाठी वाझेला भिवंडीतील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र, पुढील शस्त्रीक्रियेसाठी मुंबई येथील वोकहार्ट अथवा बॉम्बे रुणालयात दाखल करण्याची परवानगी द्या, अशी विनंती करणारा अर्ज वाझेनं दाखल केला आहे. त्या अर्जावर गुरूवारी न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांच्यापुढे सुनावणी झाली असता सरकारी पक्षाकडनं त्याला विरोध झाला नाही. त्यामुळे कोर्टानं वाझे यांना मुंबईच्या वोकहार्ट रूग्णालयात सशर्त उपचार घेण्याची परवानगी देण्यात आलीय. यादरम्यान त्यांच्या पत्नीलाही रूग्णालयात त्यांच्यासोबत उपस्थित राहण्याची मुभा कोर्टानं दिली आहे.

अँटिलिया आणि मनसूख हिरेन प्रकरणात सचिन वाझेने वसुली केलेल्या पैशांचा वापर: NIA 

जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर 20 जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आली होती. त्यानंतर काही तासांतच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली. दरम्यान तळोजा कारागृहात असलेल्या वाझे याने हदयाशी संबंधित त्रास असल्यानं न्यायालयाच्या परवानगीनंतर 30 ऑगस्ट रोजी त्यांना भिवंडी येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र, तिथं वैद्याकिय उपचार केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिय करण्याची गरज निर्माण झाल्यानं आपल्यावर मुंबईतील बड्या रुणालयात वैद्याकिय उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यास परवानगी द्या, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. दरम्यान वाझे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्यावर अँजिओप्लास्टीचा सल्ला दिलाय. मात्र, वाझे हे बायपास सर्जरी करण्यासाठी आग्रही आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नवा गौप्यस्फोट, पंकजाताईबाबत म्हणाले...Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP MajhaSiddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावेABP Majha Headlines : 04 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
Embed widget