एक्स्प्लोर

Ashish Shelar: मुंबई कोस्टल प्रकल्पात अफरातफर झाल्याचा आरोप; आशिष शेलार यांनी 'या' मुद्यांवर शिवसेनेला घेरले!

Ashish Shelar on Coastal Road Project: भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पावर प्रश्न उपस्थित केले.

BJP Leader Ashish Shelar on Coastal Road Project : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी असताना आता भाजपने सत्ताधारी शिवसेनेला आरोपीला पिंजऱ्यात उभे करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अफरातफर झाली असल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. कॅगच्या अहवालाचा दाखला देत त्यांनी महापालिका प्रशासन, सत्ताधारी शिवसेना आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोपांचे बाण सोडले. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' समजला जातो. 

आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आशिष शेलार यांनी म्हटले की, प्रकल्प सल्लागार असलेल्या एजन्सींना बेकायदेशीरपणे आर्थिक मदत केली जात आहे. मुंबई  महापालिकेचा पैसा त्यांच्या घशात जात आहे.  त्यांना अवास्तव आणि अनाकलनीय बिलाचे पैसे दिले जात असल्याचे शेलार यांनी म्हटले. 

एक एप्रिल ते 2016 आणि 2020 दरम्यान झालेल्या कामावर कॅगने ठपका ठेवला असून कोस्टल रोड प्रकल्पावर भ्रष्टाचाराचा तवंग येण्यास सुरुवात झाली असल्याचे शेलार यांनी म्हटले. कॅगने आपल्या अहवालात काही गंभीर मुद्दे उपस्थित केले असून महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे शेलार यांनी म्हटले. 

प्रकल्पात छुपा अजेंडा आहे का?

कोस्टल रोड प्रकल्पात 90 हेक्टर मोकळी जागा तयार होणार आहे. या मोकळ्या जागेत निवासी अथवा वाणिज्यिक बांधकाम होणार नाही अशी हमी केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने मागितली होती. त्याला, 28 महिने उलटून गेले आहेत. पालिकेने अद्याप हमीपत्र दिले नाही. महापालिकेचा काही काही छुपा अजेंडा आहे का, असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला.

कोस्टल रोड प्रकल्पातील मोकळ्या जागेत अथवा प्रकल्प मार्गात अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण होणार नाही यासाठी नेमकी काय उपाययोजना करण्यात येणार आहेत, त्याचा आराखडाही मागितला होता. मात्र, महापालिकेने अद्यापही तो सादर केला नसल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.

केंद्राच्या पर्यावरण विभागाने म्हटले की, 90 हेक्टर जागेचे सुशोभिकरण करण्याची सूचना केली होती. या जागेचा फायदा मुंबईकरांना झाला असता. मात्र, 29 महिन्यानंतरही पालिकेकडून याबाबतचे नियोजन तयार नसल्याचा आरोप शेलार यांनी केला. 

त्याशिवाय या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कोळी व इतरांच्या पुनर्वसनाचा मुद्दा शेलार यांनी उपस्थित केला. प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याची सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केली होती. मात्र, मुंबई महापालिकेने अद्यापही पुनर्वसन केले नसल्याचा आरोप शेलार यांनी केला. कोस्टल रोड प्रकल्पातील मोकळ्या जागेवर काही इतर बांधकाम सुरू होणार का, महापालिकेचा काही छुपा अजेंडा आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget