एक्स्प्लोर
Advertisement
Coronavirus | आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्रालयात कोरोना नियंत्रण कक्ष
राज्यात कोरोना विषाणूमुळे (COVID-19) उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्रालयात राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
मुंबई : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील समस्या समजून घेण्यासह मदत कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी मंत्रालयात कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर विविध उपाययोजना हाती घेतल्या असून राज्य सरकार, प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत. राज्यात कोरोना विषाणूमुळे (COVID-19) उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्रालयात राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार हा नियंत्रण कक्ष कार्यन्वित करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी विविध संस्था, व्यक्ती यांना शासकीय यंत्रणांना सहकार्य, सहयोग करण्याची इच्छा असते त्यांनी ccrmaharashtra.aid@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. शासनाने केलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यवसायांच्या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर त्यांनी ccrmaharashtra.ind@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन कोरोना नियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित शंकांचे निरसन कुणाला करावयाचे आहे त्यांनी ccrmaharashtra.ind@gmail.com या ईमेलवर तर शासनाने दिलेल्या निर्देशांबद्दल, आखलेल्या धोरणांच्या अंमलबजावणीबद्दल स्पष्टीकरण हवे असल्यास ccrmaharashtra.policy@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन या कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
Coronavirus | मास्क, हँड सॅनिटायझरच्या किमती केंद्र सरकारकडून निश्चित
राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील असा: • पिंपरी चिंचवड मनपा 12 • पुणे मनपा 11 (21 मार्च रोजी 2 रुग्ण आढळले) • मुंबई 19 (21 रोजी ८ रुग्ण आढळले) • नागपूर 04 • यवतमाळ, कल्याण प्रत्येकी 04 (21 मार्च रोजी प्रत्येकी 1 रुग्ण आढळले) • नवी मुंबई 03 • अहमदनगर 02 • पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी प्रत्येकी 1 एकूण 64 (मुंबईमध्ये एक मृत्यू)
Coronavirus | दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर; 31 मार्चनंतर परीक्षेची तारीख जाहीर होणार
राज्यात आज एकूण 275 परदेशातून आलेले प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण १८६१ प्रवासी आले आहेत. 18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 1592 जणांना भरती करण्यात आले होते. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 1208 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 64 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
करोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे,अशा तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त होत आहेत. पाळीव प्राण्यांपासून करोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत, त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement