एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CORONA । लोकांनी नाही ऐकलं तर कुठल्याही क्षणी लॉकडाऊन : आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे आज माझा कट्ट्यावर आले होते. ते म्हणाले की, लॉकडाऊन करायलाच हवं. यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहोत. आता अंशतः लॉकडाऊन आहेच. लॉकडाऊन केलंच पाहिजे या विचाराचे आम्ही सगळे जण आहोत. मात्र यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करावी लागेल.
मुंबई : कोरोनाचा वेग वाढू नये यासाठी मुंबई संपूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत विचार सुरु आहे. लॉकडाऊन करायलाच हवं. आता अंशतः लॉकडाऊन आहेच. लॉकडाऊन केलंच पाहिजे या विचाराचे आम्ही सगळे जण आहोत. मात्र यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करावी लागेल. यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहोत. मुंबईकरांनी जर नाही ऐकलं तर कुठल्याही क्षणी लॉकडाऊन होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, नागरिकांनी सरकार ज्या ज्या सुचना देत आहे तेवढ्या काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. आमच्या आवाहनानंतर सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर गर्दी खूप कमी झाली आहे. मात्र तरी देखील आपण गर्दी पूर्ण बंद केली पाहिजे. आपण शासकीय कार्यालय, खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे तरीसुद्धा आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम या पद्धतीने काम करा, सूचनांचे आणखी काटेकोर पालन केले पाहिजे, असे ते म्हणाले.
आपण ज्या उपाययोजना करीत आहोत त्या समाधानकारक असल्या तरी विषाणू एकेक पाउल पुढे टाकत असल्याने अधिक काळजी घेतली पाहिजे. यंत्रणेमध्ये काम करणारीही माणसेच आहेत. नागरिकांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावरचा भार वाढेल असं कृत्य आपल्याकडून व्हायला नको, असंही ते म्हणाले.
बाहेरून येणाऱ्या सर्व फ्लाईट्स बंद कराव्यात
बाहेरून येणाऱ्या सर्व फ्लाईट्स बंद कराव्यात, अशी विनंती केंद्र सरकारला करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव हा बाहेरील देशातून आला आहे. बाहेरून आलेल्या लोकांमुळेच हा रोग महाराष्ट्र आणि देशात पसरला आहे, असंही ते म्हणाले.
Coronavirus | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 49, दोघे व्हेंटिलेटरवर : राजेश टोपे
मी काल पुण्यात गेलो होतो, पुण्यात बऱ्यापैकी शुकशुकाट आहे. मुंबईत देखील लोकांनी स्वतःहून बाहेर पडणे टाळावे अन्यथा सरकारला कारवाई करावीच लागेल, असंही ते म्हणाले. जर शहरातील बाधित व्यक्ती ग्रामीण भागात केला तरच ग्रामीण भागात याचा धोका आहे, असं देखील त्यांनी म्हटलं. विमानतळावर आज 12 देशांमधील विमानांना बंदी घातली आहे. त्यामुळे काही जण या 12 व्यतिरिक्त देशांमधून विमानातून भारतात येत आहे. या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची नुसती तपासणी करुन सोडून दिलं जातं. पण यामुळे नुकसान होऊ शकतं. हा मुद्दा मी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना सांगितला. त्यांनाही तो पटला आहे. मी आज विमानतळावर जाऊन पाहणी करणार आहे. येणाऱ्या प्रवाशांची ट्रॅव्हल हिस्ट्री घेणार आहे, असं राजेश टोपे यांनी नमूद केलं. Coronavirus | कोरोना व्हायरस | मुंबईतील लोकल ट्रेन बंद करणे हा शेवटचा पर्याय : राजेश टोपे | ABP Majha महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या पुणे - 19 मुंबई - 11 नागपूर - 4 यवतमाळ - 3 कल्याण - 3 नवी मुंबई - 3 रायगड - 1 ठाणे - 1 अहमदनगर - 2 औरंगाबाद - 1 रत्नागिरी- 1अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement