एक्स्प्लोर

Coronavirus : मुंबईतील डोंगरी भागात कर्फ्यूची अंमलबजावणी करताना पोलिस हतबल

टेमकर स्ट्रीट भागात कर्फ्यू असताना देखील मोठ्या प्रमाणात लोक मशीदीत नमजासाठी जमले होते. यावर पोलिसांनी यांनी कडक कारवाई करत जमलेल्या लोकांना बाहेर काढत मशीदीला ताळं ठोकलं.

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सोमवारपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाईलाजास्तव मला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पण संचारबंदीची अंमलबजारवणी करताना पोलिसांना खूप मेहनत करावी लागत आहे. मुंबईतील काही भागात लोक काहीही कारण नसताना देखील घरा बाहेर पडत आहे. काही भागात पोलिस या लोकांना समजावून घरी पाठवत आहे. तर काही ठिकाणी कायद्याचा वापर करावा लागत आहे. मुंबईतील डोंगरी भागाचे सहायक पोलिस आयुक्त अविनाश धर्माधिकारी आपल्या भागात फिरुन माईकवरुन लोकांना घरी राहण्याबाबत सूचना देत होते. डोंगरीतील टेमकर स्ट्रीट भागात कर्फ्यू असताना देखील मोठ्या प्रमाणात लोक मशीदीत नमजासाठी जमले होते. यावर अविनाश धर्माधिकारी यांनी कडक कारवाई करत जमलेल्या लोकांना बाहेर काढत मशीदीला ताळं ठोकलं. तसेच याविरोधात गुन्हा देखील नोंदवला. काही भागात लोकांनी पोलिसांसोबत हुज्जत देखील घातली. यावर सहायक पोलिस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी ‘बहुतेक लोकांना वाटतं आहे की त्यांना काही होणार नाही. आम्ही त्यांना कोरोनाच्या गंभीरतेबाबत समजवत आहोत. जे लोकं आमचे म्हणणं ऐकतं नाही अशांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल,’ असा इशारा दिला. दरम्यान दुसऱ्या भागात पोलिस अनावश्यक कांमासाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवी करताना दिसून आले. काही भागात लोकांना पोलिसांच्या काठ्यांचा प्रसाद खावा लागला. अशा प्रकारची कारवाई मुंबईतच नाही तर राज्यात होताना आपल्याला पाहयला मिळाली. VIDEO | संचारबंदी असतानाही डोंगरीतील लोक घराबाहेर राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 101 वर राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 101 वर पोहोचली आहे. पुण्यात तीन आणि साताऱ्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंता आणखी वाढली आहे. काल संध्याकाळीही सांगलीत चार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा आता 500 पार झाला आहे. तर 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मुंबईतील 12 जणांची दुसरी चाचणी निगेटिव्ह दिलासादायक बातमी म्हणजे मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालय दाखल केलेल्या 12 रुग्णांची दुसरी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व रुग्णांना पुढील 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. संबंधित बातम्या : coronavirus | सांगली जिल्ह्यात कोरोनाचे चार नवे रूग्ण भिवंडीत होम कोरेन्टाईन संशयितांची नागरीकांना भीती, कारवाई करण्यात प्रशासन अपयशी बाहेरुन येणाऱ्यांची तपासणी, दिवसाआड औषध फवारणी; कोल्हापुरातील माणगावाचा स्तुत्य उपक्रम

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget