(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | मुंबईकरांची भूक भागवणारी डबेवाल्यांची सेवा उद्यापासून 31 मार्चपर्यंत बंद
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 20 ते 31 मार्चपर्यंत डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट घेतला आहे.
मुंबई : देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 175 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसात 20 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण सध्या महाराष्ट्रात असून त्यांचा आकडा 47 आहे. तर, आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने बंद करण्याच्या आवाहनाला आता मुंबईच्या डबेवाल्यांनी साथ दिली आहे.
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 20 ते 31 मार्चपर्यंत डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट घेतला आहे. मुंबईच्या डबेवाल्याच्या जेवणावर अवलंबून असणारे असे दोन लाख ही सेवा बंद झाल्यामुळे प्रभावित होणार आहे.
मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी, राज्य सरकारने सर्व नागरिकांना घराबाहेर पडू नये तसेच सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवण्याचं आवाहन केलं आहे. त्यानुसारच आम्ही हा निर्णय घेतल्याचं सांगितलं .तसेच शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन सर्वांनी केलं पाहिजे जेणे करुन आपण या विषाणूंना रोखू शकू असही ते म्हणाले. जर एप्रिलपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आल्यास आवशक्यतेनुसार आपण सेवा सुरु केली जाणार असल्याचं उल्हास मुके यांनी सांगितलं.
दरम्यान कोरोना विषाणूंशी जागतिक युद्ध सुरु आहे आणि हे युद्ध घाबरुन जिंकता येणार नाही, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाबद्धल ते राज्याला संबोधित करत होते. राज्य सरकारने कोरोना विषाणूंच्या संकटाशी लढण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देतानाच त्यांनी अनावश्यक गर्दी टाळण्याचं आणि घरातच बसून काम करण्याच आवाहन केलं. कोणतंही युद्ध घाबरुन लढता येत नाही, तर युद्ध जिंकण्यासाठी जिद्दीची आवश्यकता असते, असंही त्यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या पुणे - 19 मुंबई - 11 नागपूर - 4 यवतमाळ - 3 कल्याण - 3 नवी मुंबई - 3 रायगड - 1 ठाणे - 1 अहमदनगर - 2 औरंगाबाद - 1 रत्नागिरी- 1
संबंधित बातम्या
Coronavirus | क्वॉरन्टाईनमधून पळ काढणाऱ्यांवर पोलिसांमार्फत कारवाई करणार : अनिल देशमुख
Coronavirus | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 49, दोघे व्हेंटिलेटरवर : राजेश टोपे
Coronavirus | घाबरुन कोणतंही युद्ध जिंकता येत नाही, महाराष्ट्र नक्की जिंकणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे