कोरोनाची लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करु नये, डॉक्टरांना दाखवा : राजेश टोपे
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 466 वर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 572 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाच्या या संकटात डॉक्टर्स, नर्सेस, एनजीओ, अत्यावश्यक सेवा सुविधांमधील लोक मोठं योगदान देत आहे, या सर्वांचे राजेश टोपे यांनी आभार मानले.
![कोरोनाची लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करु नये, डॉक्टरांना दाखवा : राजेश टोपे coronavirus, Health minister rajesh tope Press conference कोरोनाची लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करु नये, डॉक्टरांना दाखवा : राजेश टोपे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/21174734/rajesh-tope.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची आकडेवारी आणि कोरोनाची राज्यातील सद्यस्थितीची माहिती पत्रकार परिषदेद्वारे जनतेला दिली. राज्यातील कोरोनाबाधित लोकांची संख्या 4666 वर पोहोचली आहे. महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे 572 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाच्या या संकटात डॉक्टर्स, नर्सेस, एनजीओ, अत्यावश्यक सेवा सुविधांमधील लोक मोठं योगदान देत आहे, या सर्वांचे राजेश टोपे यांनी आभार मानले.
कोरोनाबाधीत रुग्णांबद्दल माहिती देताना अनेक रुग्णांना कोरोनाची लक्षणेच दिसून येत नसल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. मात्र ज्यांना कोरोना लक्षणे दिसत आहेत त्यांनी दुर्लक्ष करु नका. कोरोनाची लक्षणे दिसत असून त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करुन घ्या, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.
चिंता वाढवणारी बातमी! राज्यात 466 नव्या रूग्णांची भर; कोरोना बाधितांचा आकडा 4666 वर
राज्यात कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या सूचनेनुसारच
महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या (इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) सूचनेनुसार केल्या जात आहे. केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपीड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात 75 हजार चाचण्या केल्या जातील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान स्पाईक येण्याची शक्यता
राज्याचा कोरोना रुग्ण दुप्पटीचा वेग मंदावत असून सुरुवातीला दोन दिवसांवर असणारा हा दर आता सुमारे 7 दिवसांवर गेला आहे. हा दर 20 ते 25 दिवसांवर यावा तेव्हाच काहीशी समाधानाची बाब मानता येईल. मात्र 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान स्पाईक येण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी आपली सगळी तयारी आहे. सोबतच महाराष्ट्राच्या जनतेने स्वयंशिस्त पाळली पाहिजे, असंही राजेश टोपे म्हणाले.
कोरोना उपचारासाठी असलेल्या रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिंजन स्टेशन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक खाटेजवळ ऑक्सिजन मास्क आणि त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यकता वाटल्यास त्याचा वापर केला जाईल. मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ नये म्हणून त्याच्या उत्पादकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे.
रेड, ऑरेंज, ग्रीन झोनची विभागणी कोरोनाचे 15 हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रेड झोन असेल. तर 14 दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही, असा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असेल. तर 28 दिवस नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही, तो जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.- COVID-19 | प्रियांका चोप्रापासून लेडी गागापर्यंत जगभरातील सर्व सेलिब्रिटींनी 'कोरोना वॉरियर्स'चे मानले आभार
- coronavirus | देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 16 हजारांवर, आतापर्यंत 519 जणांचा मृत्यू
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)