एक्स्प्लोर
Coronavirus मुंबई-नागपुरात मोठ्या प्रमाणात बनावट सॅनिटायझर जप्त; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
मुंबईत एक कोटींचं बनावट सॅनिटायझर जप्त करण्यात आलं आहे. तर नागपुरात एक हजार बाटल्या हस्तगत केला आहे.
मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मास्क आणि हँड सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी सांगितले जात आहे. परिणामी लोक मोठ्या प्रमाणात हँड सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी करत आहे. त्यामुळे बाजारात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर, या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेकांनी कमी दर्जाचे हँड सॅनिटायझर आणि मास्क बाजारात आणले जात आहे. मुंबईतील नाहूरमधून एक कोटींचं बनावट सॅनिटायझर जप्त करण्यात आला आहे, तर नागपुरात एक हजार बाटल्या हस्तगत केल्या आहेत
मुंबईतून एक कोटींचं बनावट सॅनिटायझर जप्त
मुंबईतील नाहूरमधून तब्बल एक कोटी रुपयांचं सॅनिटायझर साठा जप्त करण्यात आलं आहे. मुंबईतून विदेशात पाठवण्यासाठी हँड सॅनिटायझर बनवण्यात येत होते. मात्र त्याचवेळी अन्न आणि औषध प्रशासनानं धाड टाकत कारवाई केली. विशेष हे सॅनिटायझरची निर्मिती करणाऱ्यांनी उत्पादनाचा परवानाही घेतला नव्हता. सिद्धिविनायक डायकॅम प्रा.लिमिटेड कंपनीचे नाव या कंपनीचे नाव असून जग भरात सॅनिटायझरचा दुष्काळ असल्याचा फायदा घेत बक्कळ पैसे कमावण्याचा कंपनीचा प्रयत्न होता.
#Corona positive patients in train | क्वॉरंटाईन केलेल्या चौघांचा चक्क रेल्वेतून प्रवास, हातावर क्वॉरंटाईनचा शिक्का
नागपुरात बनावट सॅनिटायझरच्या एक हजार हस्तगत
नागपूरमध्येही बनावट सॅनिटायझरच्या एक हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. सीताबर्डीतील गुरुकृपा ट्रेडर्समध्ये फ्लोर क्लिनिंगचे केमिकलयुक्त साहित्य वापरून हे बनावट सॅनिटायझर बनवले जात होते. नागपूरच्या सीताबर्डी परिसरात पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करत बोगस सॅनिटायझर बनवणाऱ्या फर्मला सील केले आहे.
भर बाजारात गुरुकृपा ट्रेडर्स नावाच्या फर्म मध्ये हा गोरखधंदा सुरू होता. या ठिकानातून एफडीए आणि पोलिसांनी नकली आणि शरीराला अपायकारक ठरतील असे एक हजार पेक्षा जास्त सॅनिटायझर बनवण्यासाठीचं केमिकल्स आणि कच्चा माल जप्त केला आहे. आज संध्याकाळी जेव्हा या दुकानात धाड टाकण्यात आली, तेव्हा त्या ठिकाणी फ्लोर क्लिनिंगसाठीचे केमिकल मोठ्या प्रमाणावर आढळले. त्यामुळे पोलिसांना शंका आहे की कोरोनाचे वाढते प्रादुर्भाव पाहून संबंधित व्यापाऱ्याने सॅनिटायझर ही बनवणे सुरू केले होते. त्यासाठी चक्क फ्लोर क्लिनिंगचे केमिकल वापरले जात होते. एफडीएने संपूर्ण साहित्य जप्त केले असून पुढील तपासणीसाठी सर्व केमिकल प्रयोगशाळेत पाठवले आहे.
coronavirus | नागपूर पोलिस आता तुमच्या दारी..., कोरोनाला रोखण्यासाठी नागपूर पोलिस सरसावले
तर, कायदे आणखी कडक करणार
राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेकांनी हँड सॅनिटायझर आणि मास्कचा साठा करत बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण केला आहे. त्याविरोधात सरकार आता कडक कारवाई करणार असल्याचा इशारा राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे. अन्न व औषध प्रशासना अंतर्गत यावर चर्चा झाली. मागच्या आठ दिवसात अन्न व औषध प्रशासनाने राज्यात 22 ठिकाणी कारवाया केल्या आहेत. तर, लोकांनीही गरज नसताना या वस्तूंचा साठा केल्यानेही तुटवडा निर्माण झाल्याची माहिती शिंगणे यांनी दिली. त्यामुळे अशा नागरिकांवरही कारवाई केली जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement