एक्स्प्लोर

Coronavirus | डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय 'मास्क' विकाल तर खबरदार

एकीकडे कोरोनाचे संशयित रुग्ण देशात वाढत असताना काळजी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एन 95 मास्कचा आग्रह केला जात आहे. त्यामुळे एन 95 मास्क मोठ्या प्रमाणवर खरेदी केली जात आहे. आता सद्यस्थितीत मुंबईतील अनेक मेडिकलमध्ये हे एन 95 मास्क उपलब्ध नसल्याचं चित्र आहे.

मुंबई : औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय ‘मास्क’ विकू नयेत असे निर्देश राज्याच्या अन्न व औषध विभागाने सर्व संबंधितांना दिले आहेत. कोरोना वायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जगभरात एन 95 मास्क मोठ्या प्रमाणावर वापरले जात असताना मुंबईत या मास्कचा काळाबाजार सुरू असल्याचे एबीपी माझाने काल मुंबईतील मेडिकलचा रियालिटी चेक करून निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्तांनी याची दखल घेत अशा एन 95 काळाबाजार करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जो औषध विक्रेता अशा प्रकारची एन 95 मास्कची साठवणूक करून वाढीव भावाने विकत असेल त्यावर निरीक्षकांना दक्ष राहायचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. देशातील करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणारे सामाजिक कार्यक्रम पुढे ढकलावेत असे निर्देश केंद्र सरकारने आज सर्व राज्यांना दिले आहेत. दरम्यान राज्यात आता पुणे आणि नागपूर विमानतळांवर देखील स्क्रिनिंग सुरु करण्यात आले आहे. सध्या 25 जण रुग्णालयात निरीक्षणाखाली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

#CoronaMask Sting operation 30₹चा कोरोनाचा N95 मास्क 400रुपयांना? मास्कचा काळा बाजार कोण करतंय?

माहितीनुसार मार्च पर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 684 विमानांमधील 83 हजार 516 प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व करोना बाधित देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यात पुणे व नागपूर विमानतळावर देखील स्क्रिनिंग सुरू झाले आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 516 प्रवासी आले आहेत. एबीपी माझा इम्पॅक्ट | एन 95 मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई होणार 18 जानेवारी 2020 पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 229 जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 204 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. इतर 25 जणांचे अहवाल आज प्राप्त होतील. आजवर भरती झालेल्या 229 प्रवाशांपैकी 204 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या मुंबईत 16 जण तर नाशिक येथे 3 जण, पुणे येथे 4 जण तर नांदेड, सांगली येथे प्रत्येकी 1 जण भरती आहेत. राज्यात केंद्र सरकारच्या सूचनेनुसार अशी होतेय कार्यवाही
  • वुहान (चीन ) मधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला 14 दिवसांकरिता विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.
  • इतर बाधित देशातील प्रवाशांना लक्षणे असतील तरच विलगीकरण कक्षात भरती करुन त्याची प्रयोगशाळा तपासणी करण्यात येते.
  • बाधित भागातून येणा-या प्रत्येक प्रवाशाला 14 दिवसांकरिता घरी थांबण्यास (होम आयसोलेशन) सांगण्यात आले आहे.
  • या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील 14 दिवस दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. त्यांच्यामध्ये करोना आजार सदृश्य लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते.
  • याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळवण्याबाबत देखील प्रत्येक प्रवाशास सुचित करण्यात आले आहे.
  • या दैनंदिन पाठपुराव्यामध्ये एखाद्या प्रवाशामध्ये संशयित करोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.

संबंधित बातम्या :

Coronavirus | देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 30 वर, दिल्लीतील प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद

ब्रिटनचा कोरोना संशयित पर्यटक गोमेकॉत दाखल

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवणार?, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष, मागच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवणार?, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष, मागच्या सुनावणीत काय घडलं?
Mumbai Monsoon Diseases : मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Embed widget