बीएमसीच्या कारवाईच्या इशाऱ्याचा परिणाम, 75 टक्के नर्सिंग होम सुरु
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 1 हजार 416 खाजगी नर्सिंग होमपैकी 1 हजार 68 एवढे खासगी नर्सिंग होम सुरू झाले आहेत.
मुंबई : कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचारांसाठी खासगी नर्सिंग होम आणि दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश देऊनही अनेक ठिकाणी या सेवा सुरु झालेल्या नाहीत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सुमारे 75 टक्के खाजगी नर्सिंग होम जरी चालू झाले असले, तरी उर्वरित सुमारे 25 टक्के नर्सिंग होम अजूनही बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार सूचना देऊन देखील हे नर्सिंग होम आपली सेवा सुरू करत नसल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या नर्सिंग होमचे परवाने रद्द करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी आज सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 1 हजार 416 खाजगी नर्सिंग होमपैकी 1 हजार 68 एवढे खासगी नर्सिंग होम सुरू झाले आहेत. तर महापालिका क्षेत्रातील 99 डायलिसिस सेंटरपैकी 89 सुरू झाले आहेत.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सुमारे 75 टक्के खाजगी 'नर्सिंग होम' जरी चालू झाले असले, तरी उर्वरित सुमारे 25 टक्के नर्सिंग होम अजूनही बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार सूचना देऊन देखील हे 'नर्सिंग होम' आपली सेवा सुरू करत नसल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सदर 'नर्सिंग होम' चे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरू करावी व त्या अनुषंगाने सर्व संबंधितांना नोटीस द्याव्यात, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी आज सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बंद असणाऱ्या खाजगी दवाखान्यांबाबत 'एपिडेमिक ॲक्ट 1897' (साथरोग कायदा 1897) नुसार कारवाई करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.
खाजगी नर्सिंग होम, खाजगी दवाखाने यांना दिलेल्या मार्गदर्शक सूचना -
- दवाखान्यात येणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान हे 'विना स्पर्श' (Non Contact Temperature) पद्धतीने तपासावे. संबंधित व्यक्तीच्या शरीराचे तापमान 98.6 फॅरेनहाईट किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास अशा व्यक्तींना तात्काळ महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये किंवा फिव्हर क्लिनिकमध्ये पाठवावे.
- एखाद्या व्यक्तीची लक्षणे ही 'कोरोना कोविड 19' सारखी असल्यास अशा व्यक्तींना महापालिकेने निर्देशित केलेल्या केंद्रांवर पाठवावे.
संबंधित बातम्या :