(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यात सर्वाधिक एका दिवसात 2940 कोरोना बाधित रुग्णांची वाढ; एकट्या मुंबईत 1751 जणांची नोंद
राज्यात एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक 2940 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. पैकी एकट्या मुंबईत 1751 कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तर, आज 63 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला.
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 2940 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 44,582 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 30,474 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात सर्वाधिक 63 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 27 जण मुंबई, पुण्यातील 9, जळगाव 8, वसई विरारमध्ये 3, औरंगाबाद शहरात 3, साताऱ्यात 2, मालेगाव 1, कल्याण डोंबिवली 1, उल्हासनगर 1, पनवेल 1 तर नागपूर शहारात एकाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 1517 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 857 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 32 हजार 777 नमुन्यांपैकी 2 लाख 88 हजार 195 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 44,582 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 69 हजार 275 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 28 हजार 430 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 12,583 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
केंद्राच्या पॅकेजमधील फोलपणा दिसल्यामुळे फडणवीस राज्याकडे पॅकेज मागत आहेत : जयंत पाटील
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 44,582
मृत्यू - 1517
मुंबई महानगरपालिका- 27,251 (मृत्यू 909)
ठाणे- 336 (मृत्यू 4 )
ठाणे महानगरपालिका- 2234 (मृत्यू 34)
नवी मुंबई मनपा- 1776 (मृत्यू 29)
कल्याण डोंबिवली - 727 (मृत्यू 6)
उल्हासनगर मनपा - 144 (मृत्यू 2)
भिवंडी, निजामपूर - 82 (मृत्यू 3)
मिरा-भाईंदर- 388 (मृत्यू 4)
पालघर - 107 (मृत्यू 3 )
वसई- विरार- 451 (मृत्यू 14)
रायगड- 299 (मृत्यू 5)
पनवेल- 282 (मृत्यू 12)
नाशिक - 115
नाशिक मनपा- 93 (मृत्यू 2)
मालेगाव मनपा - 710 (मृत्यू 44)
अहमदनगर- 49 (मृत्यू 5)
अहमदनगर मनपा - 22
धुळे - 17 (मृत्यू 3)
धुळे मनपा - 80 (मृत्यू 6)
जळगाव- 286 (मृत्यू 36)
जळगाव मनपा- 109 (मृत्यू 5)
नंदुरबार - 32 (मृत्यू 2)
पुणे- 283 (मृत्यू 5)
पुणे मनपा- 4499 (मृत्यू 231)
पिंपरी-चिंचवड मनपा- 211 (मृत्यू 7)
सातारा- 204 (मृत्यू 4)
सोलापूर- 10 (मृत्यू 1)
सोलापूर मनपा- 522 (मृत्यू 32)
कोल्हापूर- 175 (मृत्यू 1)
कोल्हापूर मनपा- 20
सांगली- 62
सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 9 (मृत्यू 1)
सिंधुदुर्ग- 10
रत्नागिरी- 135 (मृत्यू 3)
औरंगाबाद - 22
औरंगाबाद मनपा - 1165 (मृत्यू 42)
जालना- 46
हिंगोली- 112
परभणी- 17 (मृत्यू 1)
परभणी मनपा- 5
लातूर - 58 (मृत्यू 2)
लातूर मनपा- 3
उस्मानाबाद- 26
बीड - 26
नांदेड - 15
नांदेड मनपा - 83 (मृत्यू 4)
अकोला - 31 (मृत्यू 2)
अकोला मनपा- 336 (मृत्यू 15)
अमरावती- 9 (मृत्यू 2)
अमरावती मनपा- 136 (मृत्यू 12)
यवतमाळ- 113
बुलढाणा - 39 (मृत्यू 3)
वाशिम - 8
नागपूर- 3
नागपूर मनपा - 457 (मृत्यू 7)
वर्धा - 3 (मृत्यू 1)
भंडारा - 9
चंद्रपूर -8
चंद्रपूर मनपा - 7
गोंदिया - 28
गडचिरोली- 9
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1949 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 16,154 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 66.32 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.
Coronavirus | मुंबईतील ग्रोथ रेट हळूहळू कमी होतोय, परिस्थिती हाताबाहेर नाही : प्रा. नीरज हातेकर