एक्स्प्लोर

केंद्राच्या पॅकेजमधील फोलपणा दिसल्यामुळे फडणवीस राज्याकडे पॅकेज मागत आहेत : जयंत पाटील

केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी करत आहेत, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

मुंबई : कोरोना व्हायरसचं संकट रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने आज आंदोलन केलं. मात्र राज्य सरकार काम करत असून महाराष्ट्रात सर्वाधिक टेस्टिंग सुरु असल्याचं राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. सोबतच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी करत आहेत, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

जयंत पाटील म्हणाले की, "राज्य सरकार काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देशातील इतर राज्यात फिरुन यावं मग कळेल राज्यात किती काम सुरु आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त टेस्टिंग सुरु आहे म्हणून रुग्ण दिसत आहेत. इतर राज्यात टेस्टिंग कमी होत आहे."

केंद्राच्या पॅकेजमधील फोलपण फडणवीसांना दिसला केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसंच सरकारने राज्यातील जनतेला दमडीही दिली नाही, अशी टीका केली होती. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, "केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते पॅकेजची मागणी करत आहेत." शिवाय "केंद्राने राज्याला पैसे दिले याबाबत देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी गैरसमज झाला आहे," असा टोलाही लगावला.

भाजपच्या 'माझं अंगण रणांगण' आंदोलनाला महाविकास आघाडीकडून 'महाराष्ट्रद्रोही BJP' ट्रेंडनं उत्तर

पंतप्रधान मोदी तरी कुठे बाहेर गेले? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडत नाहीत, अशी टीका केली होती. त्यालाही जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. "चंद्रकांत पाटलांना आधी पण सल्ला दिला की घराबाहेर पडू नका. लॉकडाऊन आहे. सगळे जण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तरी कुठे बाहेर गेले? त्यामुळे चंद्रकांतदादा ऐकतील, असा विश्वास आहे," असं जयंत पाटील म्हणाले.

भाजपचं घराच्या अंगणात आंदोलन कोरोनाच्या संकटात राज्य सरकार अपयश ठरल्याचा आरोप करत भाजपने आज आंदोलन केलं. 'माझं अंगण माझं रणांगण', 'महाराष्ट्र बचाओ' अंतर्गत सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हे आंदोलन हे निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप नेत्यांनी काळ्या फिती, काळे झेंडे, रिबन आणि फलक उंचावून सरकारचा निषेध नोंदवला गेला.

महाविकास आघाडीचं भाजपविरोधात सोशल मीडिया आंदोलन दुसरीकडे महाविकास आघाडीने भाजपविरोधात सोशल मीडियावर आंदोलन सुरु केलं. महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाला मोठ्या धीराने सामोरे जात असताना भाजप गलिच्छ राजकारण करत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रद्रोही भाजपा हा हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये आहे. भाजपच्या आंदोलनाविरोधात पहिल्यांदा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सोशल मीडियावर एकत्र आले. हा हॅशटॅग सध्या देशात तिसऱ्या क्रमांकावर ट्रेण्डिंगमध्ये आहे.

Devendra Fadnavis | कोरोना रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत, सरकारबद्दल जनतेत असंतोष : देवेंद्र फडणवीस

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
Maharashtra Goverment On Student Protest: महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय
महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Embed widget