एक्स्प्लोर

3 मे नंतर झोननुसार मोकळीक देणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुंबई आणि शेजारचा परिसर, पुणे, नागपूर यासारख्या रेड झोनमध्ये काही करणं आता हिताचं नाही, असं त्यांनी सांगितलं.

मुंबई : "3 तारखेनंतर आता जेवढी बंधनं त्यापेक्षा अधिक मोकळीक प्रत्येक झोननुसार देणार आहोत. पण घाईगडबड न करता ही मोकळीक दिली जाईल," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी धीराने, खंबीरपणाने, सावधपणाने आपण पावलं टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री म्हणाले की, "3 तारखेनंतर आता जेवढी बंधनं त्यापेक्षा अधिक मोकळीक प्रत्येक झोननुसार देणार आहोत. पण घाईगडबड न करता ही मोकळीक दिली जाईल. काम सगळ्यांचीच अडली आहेत. पण आजपर्यंत बंधनं पाळली, सगळी बंधन उघडताच आर्थिक फटका बसणारच आणि विषाणू जीवावर उठेल. त्यामुळे आपण धीराने, खंबीरपणाने, सावधपणाने पावलं टाकत आहोत."

राज्यातील जनता हीच खरी संपत्ती देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन 3 मे नंतर उठणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. याविषयी उद्धव ठाकरे म्हणाले की, "अर्थचक्र रुतलंय, मोठा आर्थिक फटका बसणार, बेरोजगारी वाढणार हे खरं असलं तरी प्रत्येक राज्याची किंवा राष्ट्राची खरी संपत्ती ही जनता आहे. जनता वाचली पाहिजे. नागरिक वाचले तर हा गाडा चिखलातून काढून पुढे नेऊ शकतो."

रेड झोनमध्ये आता काही करणं हिताचं नाही मुंबई आणि शेजारचा परिसर, पुणे, नागपूर यासारख्या रेड झोनमध्ये काही करणं आता हिताचं नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच ऑरेंज झोनमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये आता कोरोनाचे रुग्ण वाढत नाहीत, पण काही अॅक्टिव्ह केसे आहेत ते जिल्हे वगळता, उर्वरित जिल्ह्यांमध्ये काय करु शकतो याचा विचार सुरु आहे. तर ग्रीन झोनमधल्या अटी-शर्ती हळूहळू काढत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

"रेड झोन म्हणजे जागृत ज्वालामुखी, ऑरेंज झोन म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी आणि ग्रीन झोन म्हणजे ज्वालामुखी जो पेटेल असा वाटत नाही," अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसच्या झोन वर्णन केलं.

तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये?

रेड झोन : मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगर

ऑरेंज झोन : रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड ग्रीन झोन : उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा

परराज्यात जाणाऱ्यांना शिस्तीने पाठवणार परराज्यात जाऊ इच्छिणाऱ्यांना अत्यंत शिस्तीने पाठवलं जाईल. संबंधित राज्यांशी सरकारशी बोलून व्यवस्था करुन त्यांना पाठवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. "तसंच इतर राज्यातील लोकांना आपल्याला आणावं लागणार आहे. राज्यातल्या राज्यात म्हणजे जे लोक गावाला किंवा पर्यटनाला गेले आणि लॉकडाऊनमुळे अडकले, त्यांना एकत्र आणणार नाही. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून प्राधान्य ठरवून त्याच्या जाण्या-येण्याची सोय करु," असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

शेतीवर बंधनं नाहीत दरम्यान शेतीवर कोणतीही बंधनं नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. "शेतकऱ्यांना बी-बियाणं, खतं पुरवली जातील. कृषी मालावर बंधनं नव्हती, मालवाहतूक मोकळी केली आहे. हळूहळू ही बंधनं उठवत आहोत. मात्र झुंबड झाल्यास ही बंधनं पुन्हा टाकली जातील," असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

आरोग्य कर्मचारी, पोलीस देवासारखं काम करत आहेत "आपण प्रत्येक पाऊल सावधानतेने टाकायला हवं. कोरोनाबाधितांवर वेळेत उपचार व्हावे, रुग्णालयं कमी पडू नयेत. डॉक्टरांवर ताण येऊन यासाठी प्रयत्न सुरु आहेत. टास्क फोर्सचे डॉक्टर होमिओपथी आणि आयुर्वेदिक डॉक्टरांना संपर्क करत आहेत. फीव्हर क्लिनिकमध्ये त्यांनी कसं काम करावं याची चाचपणी करत आहेत. आरोग्य कर्मचारी आणि पोलीस देवासारखे आपल्यासाठी खंबीरपणाने लढत आहेत. त्यांना मदत करणं आपलं काम आहे," असं मुख्यमंत्री म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget