एक्स्प्लोर

Corona Virus | कोरोना व्हायरसचा मुंबईतील बाजारपेठेवर मोठा परिणाम

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 40,000 हून अधिक लोकांना कोरोनाचं संक्रमण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनामुळे जगभरातील बाजारपेठांवर देखील मोठा परिणाम झाला आहे.

मुंबई : कोरोना व्हायरस चीनमध्ये फोफावत चालल्यामुळे चीनमधून भारतात येणाऱ्या वस्तूंचा भारतीय बाजारपेठेमध्ये तुटवडा जाणवायला सुरुवात झालेली आहे. देशातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत म्हणजेच मुंबईच्या बाजारपेठेत चायना वस्तूंचं शॉर्टेज होऊ लागल्याने या वस्तू आता महाग विकल्या जाऊ लागल्या आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण वापरणाऱ्या बहुतांशी वस्तूंमध्ये चायना वस्तू मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असतात. ज्या वस्तू बाजारपेठेत उपलब्ध असतात त्यातील बहुतांश चायनाच्या असतात. मात्र चीनमध्ये कोरोना व्हायरस आल्यामुळे चीनमधून जगभरातील व्यापारी पेठांमध्ये येणाऱ्या वस्तूंचा आता तुटवडा जाणवू लागला आहे. मुंबईतील बाजारपेठांमध्ये चायनाच्या वस्तूंनी जणू कब्जा केला असल्याचे चित्र आहे. घरगुती वस्तू , शोभेच्या वस्तू , दररोज वापरातल्या वस्तू, चपलापासून मोबाईलपर्यंत अशा सर्वच वस्तू चीनमधून मुंबईतील व्यापारपेठांमध्ये विक्रीसाठी स्वस्त दरामध्ये उपलब्ध होत असल्यामुळे बहुतांश लोक या वस्तू खरेदी करतात. स्वस्त आणि मस्त अशा स्वरूपात या वस्तू मिळत असल्यामुळे ग्राहकांना या वस्तू आकर्षित करत असतात. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून चीनमध्ये कोरोनो व्हायरस आल्यामुळे चीनमधून जगभरातील व्यापारपेठांमध्ये पाठवला जाणारा माल जैसे थे स्थितीमध्ये पडून आहे. चीनची बाजारपेठ ठप्प झाल्यामुळे याचा परिणाम जगभरातल्या व्यापारी पेठांवर झालेला आहे. मुंबईतील बाजारपेठांमध्ये चिनी माल मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. मात्र कोरोनो व्हायरसचा इफेक्ट मुंबईतील बाजारपेठांवर देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मुंबईतील बाजारपेठांमध्ये मोबाईल सह मोबाईल ॲक्सेसरीज, घर सजविण्यासाठी बेडशीट - पिलो , पिलो कवर, रंगीबिरंगी फुले, फुलदाणी , झाडे, शोभेच्या वस्तू, शोकेशमधील आकर्षक वस्तू या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असतात. या वस्तू स्वस्त मिळत असल्यामुळे मुंबईतील होलसेल मार्केटमधून मोठ्या प्रमाणात या वस्तू महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विक्रीसाठी जात असतात. मात्र मुंबईतील बाजारपेठेमध्ये या मालाची आवक थांबल्यामुळे हा बाजार थंडावलेला आहे. कोरोनो व्हायरस चीनमध्ये आल्यामुळे आता चीनमधून इतर देशांमध्ये पाठवला जाणारा माल सध्या पाठवण्यात येत नाही. त्यामुळे जगभरातील सर्वच मार्केटमध्ये चिनी मालाचा तुटवडा जाणवायला सुरुवात झालेली आहे. याचा फायदा घेत व्यापारी या वस्तू दीडपट किमतीने विक्रीसाठी ठेवत असल्याचे ही पाहायला मिळत आहे. पुढील किमान तीन महिने तरी चिनी वस्तू बाजारात चढ्या भावाने विकल्या जाणार आहेत. कारण येत्या जून महिन्यापर्यंत चीनमधून मालाची आवक होईल असं व्यापाऱ्यांना वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या जवळ असलेला माल मूळ किमतीपेक्षा अधिक चढ्या भावाने विकला जात आहे. त्यामुळे बाजारपेठांकडेही ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

Corona Virus | चीनमध्ये मृतांचा आकडा 1000 पार; 40 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग

 

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवार हे महाराष्ट्राचे ‘अर्धवटराव’, त्यांची पीआर टीम त्यांना चालवते, विक्रम पाचपुतेंचा थेट हल्लाबोल 
रोहित पवार हे महाराष्ट्राचे ‘अर्धवटराव’, त्यांची पीआर टीम त्यांना चालवते, विक्रम पाचपुतेंचा थेट हल्लाबोल 
अर्थखात्याचा निर्णय महायुतीचे नेतृत्व घेईल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाही, सपकाळांच्या टीकेला उमेश पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले, राष्ट्रवादी हा स्वाभिमानी पक्ष
अर्थखात्याचा निर्णय महायुतीचे नेतृत्व घेईल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाही, सपकाळांच्या टीकेला उमेश पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले, राष्ट्रवादी हा स्वाभिमानी पक्ष
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget