एक्स्प्लोर

Cyber Crime | कोरोनाच्या संकटात ऑनलाईन लुटारुंचा धुमाकूळ, सायबर गुन्ह्यांमध्ये दुपटीनं वाढ

कोरोनाच्या संकटात ऑनलाइन लुटारूंनी धुमाकूळ घातला आहे. देशात सायबर क्राईमच्या प्रकरणांमध्ये दुपटीनं वाढ झाल्याचं सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्सच्या संशोधनातून समोर आलं आहे.

मुंबई : कोरोनाच्या संकटात ऑनलाइन लुटारूंनी धुमाकूळ घातला आहे. देशात सायबर क्राइमच्या प्रकरणात दुप्पटीनं वाढ झाल्याचं सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्सच्या संशोधनातून समोर आलं आहे. सध्या लॉकडाऊनमुळे अवघं जग इंटरनेटवर अवलंबून आहे. बहुतांश लोकं वर्क फ्रॉम होम करतायत. त्यामुळे बड्या कंपन्यांपासून ते अगदी सामान्य व्यक्तीपर्यंत कोणीही सायबर गुन्हेगारीचा शिकार होण्याची शक्यता वाढली आहे. जानेवारीपासून कोविड थीमवर आधारित सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यात देशात 12 लाख कोविड संबंधित हाय रिक्स डोमेन्स तयार झाले. तर जवळपास 16 लाख घोटाळ्यांची नोंद झाली आहे. बँका, वित्तीय संस्था, आरोग्य सेवा कंपन्या, सरकारी संस्थांना याचा धोका अधिक आहे. WHO सारख्या आंतराष्ट्रीय संस्थेवरही मागील महिन्याभरात दुप्पट सायबर हल्ले झाल्याची बाब समोर आलेली आहे.

Coronavirus | व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड करताय, आधी महाराष्ट्र सायबरची मार्गदर्शिका वाचा!

मायक्रोसॉफ्ट क्लाउड टूल्स, स्काईप, झूम, इमेल्स, ऑनलाइन व्यवहार हॅकर्सच्या टार्गेटवर आहेत. लघू व मध्यम उद्योगांना सायबर गुन्ह्यांचा सर्वाधिक फटका बसताना दिसतोय. विविध अमिषं दाखवून ऑनलाइन फसवणूक केली जाते. अँटी व्हायरस, अँटी-मालवेयर सॉफ्टवेअर आणि सुरक्षित व्हीपीएन नसल्यास सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक होण्याचा संभाव्य धोका वाढतो, अशी माहिती समोर आली आहे.

सावधान! एक क्लिक अन् तुमचे पैसे गायब; लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन फ्रॉड 

ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक सध्या कोरोनाची भीती दाखवून आपली लाईफ इन्शुरन्स पॉलिसी संपली असून ती त्वरित प्रीमियम रक्कम भरल्यास दंड माफ होईल, प्रीमियम भरण्यासाठी इन्शुरन्स कंपनीचे नाव असलेले बनावट बँक खाते दिलं जातं. बँकांनी तीन महिन्याचे ईएमआय स्थगित करण्याचा पर्याय ग्राहकांना देऊ केला आहे. ईएमआय स्थगित करायचे आहेत का? अशी विचारणा केली जाते. ग्राहकांकडून बँक खात्याचा तपशील मागवला जातो, शिवाय मोबाईलवर वन टाइम पासवर्ड पाठवला जातो. तो फोनवर सांगा असे ग्राहकांना सांगून ग्राहकांच्या खात्यातून पैसे लांबविले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांच्या तपासामध्ये समोर आल्या आहेत. त्यामुळे सावधान राहणे गरजेचं आहे. अन्यथा कोरोनाच्या संकटात आपले खाते रिकामे झाल्यास त्यात आश्चर्य वाटायला नको त्यामुळे काळजी घ्या. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर काय बरोबर नको ते मेसेज व्हायरल करणाऱ्यांनीची जणू फौजच तयार झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्यांदा 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला तर त्यानंतर पुन्हा 3 मे पर्यंत दुसरा लॉकडाऊन घोषित केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : गुजरातमधील बहीण भावाचा सराफा दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला; पोलिसांकडून पर्दाफाश
गुजरातमधील बहीण भावाचा सराफा दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला; पोलिसांकडून पर्दाफाश
Panipuri GST Notice : पाणीपुरीवाल्याचा ऑनलाईन पेमेंटचा आकडा पाहून जीएसटी विभागाला कडाक्याच्या थंडीत दरदरुन घाम सुटला! थेट नोटीस धाडली
पाणीपुरीवाल्याचा ऑनलाईन पेमेंटचा आकडा पाहून जीएसटी विभागाला कडाक्याच्या थंडीत दरदरुन घाम सुटला! थेट नोटीस धाडली
Weather Update : काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania News : 'धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ सुरु'- दमानियाSantosh Deshmukh News : संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाचा मोर्चाMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 05 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : गुजरातमधील बहीण भावाचा सराफा दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला; पोलिसांकडून पर्दाफाश
गुजरातमधील बहीण भावाचा सराफा दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला; पोलिसांकडून पर्दाफाश
Panipuri GST Notice : पाणीपुरीवाल्याचा ऑनलाईन पेमेंटचा आकडा पाहून जीएसटी विभागाला कडाक्याच्या थंडीत दरदरुन घाम सुटला! थेट नोटीस धाडली
पाणीपुरीवाल्याचा ऑनलाईन पेमेंटचा आकडा पाहून जीएसटी विभागाला कडाक्याच्या थंडीत दरदरुन घाम सुटला! थेट नोटीस धाडली
Weather Update : काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!
Maharashtra Weather Update: सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Embed widget