एक्स्प्लोर
VIDEO : जमावावरील नियंत्रण राहिलं बाजूला, पोलिसांमध्येच भांडणं
भिवंडी शहरात एका ठिकाणी मोठा जमाव पाहून नारपोलीच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मदतीसाठी भोईवाडा पोलिस ठाण्यात संपर्क साधला आणि पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी येण्यास सांगितले. मात्र या दोन्ही पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी जमावावर नियंत्रण करण्याऐवजी आपसात वादावादी घालत, अरेवारी करण्यास सुरवात केली.

भिवंडी : जमाव नियंत्रण करण्यासाठी आलेल्या पोलिसांमध्येच वादावादी झाली. भिवंडी शहरात हा प्रकार समोर आला. या प्रकाराचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. भिवंडी शहरात एका ठिकाणी मोठा जमाव पाहून नारपोलीच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मदतीसाठी भोईवाडा पोलिस ठाण्यात संपर्क साधला आणि पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी येण्यास सांगितले. मात्र या दोन्ही पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी जमावावर नियंत्रण करण्याऐवजी आपसात वादावादी घालत, अरेवारी करण्यास सुरवात केली. यावेळी काही रहिवाशांनी या दोन पोलिसांमधील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र दोन्ही पोलीस ऐकण्याची मनस्थित नव्हते. यावेळी एका नागरिकाने या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करून तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला. अन् पोलिसांच्या दोन गटातील वादावादी समोर आली आहे. ही घटना शनिवारी पहाटे दोन ते अडीचच्या सुमाराला भंडारी कंपाऊंड परिसरात घडली. नेमकी घटना काय घडली? शनिवारी पहाटे दोन ते अडीचच्या सुमाराला एका ट्रकने भिवंडीतील भंडारी कंपाउंड परिसरातील विजेच्या ट्रान्सफार्मरला जोरदार धडक दिल्यामुळे स्फोट होऊन परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला. या ट्रकमध्ये ओव्हरलोड माल भरल्याने वरील भागात विजाचा तार अडकून पडला. मात्र चालकाला याची खबरच लागली नव्हती यामुळे त्याने ट्रक भरधाव वेगात चालवीत थेट विजेच्या ट्रान्सफार्मरमध्ये घुसवला. यामुळे मोठा आवाज होऊन बत्ती गुल झाल्याने परिसरातील जमावाने घटनास्थळी येवून गोधंळ घातला. या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र मोठ्याप्रमाणावर जमावाला पाहून नारपोलीच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मदतीसाठी भोईवाडा पोलिस ठाण्यात संपर्क साधून पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी येण्यास सांगितले. मात्र या दोन्ही पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी जमावावर नियंत्रण करण्याऐवजी आपसात वादावादी घालत, अरेवारी करण्यास सुरवात केली. यावेळी काही रहिवाशांनी या दोन पोलिसांच्या मधला वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र दोन्ही पोलीस ऐकण्याची मनस्थित नव्हते. याच वेळी एका नागरिकाने या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करून तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला. अन् पोलिसांच्या दोन गटातील वादावादी समोर आली आहे. दरम्यान, नारपोली पोलिसांनी ट्रक चालकावर वीज ट्रान्सफार्मरचे नुकसान केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. तर अपघातामुळे नुकसान झालेल्या वीज ट्रान्सफार्मरचे काम टोरेंटो वीज कंपनीच्या कामगारांनी सुरु केले असून तब्बल 48 तास लागणार असल्याने दोन दिवस परिसरातील नागरिकांना विजेविना काढावे लागणार आहे. मात्र या घटनेने परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले. पाहा व्हिडीओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट























