एक्स्प्लोर
पुलाच्या श्रेयावरुन सेना-भाजप आमनेसामने, डोंबिवलीत बॅनरबाजी
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील ठाकुर्ली ते माणकोली व कोन ते दुर्गाडी या दोन्ही खाडी पूलाच्या मंजुरीचे श्रेय घेण्यावरुन शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष बॅनर बाजीचे युद्ध सुरु झालेले आहे.
श्रेय घेण्याआधी पुलाचे बांधकाम पूर्ण करुन तो नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या दोन्ही पुलांचे भूमीपूजन उद्या म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हे भूमीपूजन कल्याण डोंबिवली महापलिका हद्दीत होणार नसून शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने हा कार्यक्रम भिवंडीच्या हद्दीत कोनगावा आणि माणकोलीत ठेवला आहे. या पुलाच्या मंजुरीसाठी शिवसेनेचे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केल्याने त्यांनी भूमीपूजनाच्या कार्यक्रमाआधीच डोंबिवलीत पाठपुरावा केलेल्या पत्र व्यवहारांचे बॅनर लावले आहेत. तर भाजपने भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे बॅनर झळकविले आहेत.
पुलाच्या मंजुरीवरुन शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले आहे. दोन्ही पुलाची एक बाजू ही कल्याण-डोंबिवलीकडे आहे. तर दुसरी बाजू भिवंडी येथे आहे. भाजपने शिवसेनेला शह देण्यासाठी भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी भिवंडीत हा कार्यक्रम मुद्दाम घेतला आहे. हे दोन्ही पूल एमएमआरडीए बांधणार असल्याने एमएमआरडीएचे अध्यक्ष मुख्यमंत्री फडणवीस आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमात न घेता भाजपने कामाचा उदोउदो केल्याने शिवसेना चांगलीच दुखावली गेली आहे. भाजपच्या मते पुलाचा पाठपुरावा माजी आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी केला आहे.
शिवसेनेच्या नाकावर टिच्चून भाजपने ही राजकीय खेळी खेळली आहे. डोंबिवलीतील भाजप आमदार व राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे राज्यमंत्री आहे. मात्र त्यांनी शिवसेनेच्या श्रेयाच्या बॅनरबाजीला उत्तर देणे पसंत केलेले नाही. तसेच कोणताही खुलासा केलेला नाही. शिवसेना ते राष्ट्रवादी असा प्रवास करणारे माजी खासदार आनंद परांजपे यांनी या पुलाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता. या पुलाला मंजुरी आघाडी सरकारने दिली होती. त्यामुळे या पुलाचे श्रेय ना शिवसेनाचे आहे. ना भाजपचे. या राजकारणात शिवसेना भाजपला चोख उत्तर देण्याकडे माजी खासदार परांजपे यांनी दुर्लक्ष केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement