विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता, काही आमदार भाजपच्या वाटेवर?
विधानसभेच्या तोंडावर राधाकृष्ण विखे-पाटलांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील काही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीत धास्ती वाढली आहे.
![विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता, काही आमदार भाजपच्या वाटेवर? congress ncp 4 mla may join bjp before vidhansabha election news update विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता, काही आमदार भाजपच्या वाटेवर?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/16031713/Congress-NCP.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीनं काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला मोठा धक्का दिला. लोकसभेनंतर भाजप विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली असून यावेळी विरोधी पक्षाचे आमदार भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यानंतर आघाडीत मोठी अस्वस्थता पसरली आहे. विधानसभेच्या तोंडावर राधाकृष्ण विखे-पाटलांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील काही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोर धरू लागली आहे.
यामध्ये माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, वडाळ्याचे आमदार कालिदार कोळंबकर, पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांच्यासह कोल्हापुरातून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा आहे.
VIDEO | मुख्यमंत्री-महाडिक भेटीनंतर धनंजय महाडिकांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाणयाव्यतिरिक्त काँग्रेसमधील काही नाराज नेत्यांची नाव चर्चेत आहेत. मुंबईतील कृपाशंकर सिंग, सांगलीमधील प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. आमदार विश्वजित कदम यांचेही मुख्यमंत्र्यांशी असलेले संबंध पाहता त्याचे नाव चर्चेत आले होते. मात्र आपण पक्ष सोडणार नसल्याचं विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलं आहे.
VIDEO | भाजप नेते संपर्कात, मात्र काँग्रेस सोडण्याचा विचार नाही : विश्वजीत कदम
काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या भेटीनंतर आज माण-खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांची संगमनेर येथे भेट घेतली.
कालिदास कोलंबकर हे गेले दीड वर्ष मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते. चिखालीचे आमदार राहुल बोंद्रे देखील काल विखे पाटील यांना भेटल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत देखील युतीची स्थिती मजबूत असल्यामुळे काँग्रेसमध्ये निराशाजनक चित्र आहे. याचा फायदा भाजप उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)