एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेस नेते राजेंद्र गावित भाजपात, पालघरची उमेदवारी मिळणार
आदिवासी समाजातील काँग्रेसचे मोठे नेते आणि माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईतील भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश केला.
मुंबई : काँग्रेसला राज्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आदिवासी समाजातील काँग्रेसचे मोठे नेते आणि माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईतील भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश केला.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये लढाई रंगणार आहे. कारण, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्यात आली. वनगा यांनी आज शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
पालघरच्या जागेची उमेदवारी देण्यासाठी भाजपकडूनही राजेंद्र गावित यांचं नाव संसदीय बोर्डाकडे पाठवलं जाणार आहे. त्यानंतर राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. त्यामुळे ही लढाई श्रीनिवास वनगा विरुद्ध राजेंद्र गावित अशी रंगण्याची शक्यता आहे.
अजूनही शिवसेनेच्या पाठिंब्याची आशा : मुख्यमंत्री
चिंतामणराव वनगा यांच्या मुलालाच भाजपकडून तिकीट मिळणार होतं, मात्र जे झालं तै दुर्दैवी आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पाघरची जागा भाजपची आहे. शिवसेनेने माघार घ्यावी, अजूनही शिवसेनेच्या पाठिंब्याची आशा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
पालघरमध्ये चिंतामणराव वनगा यांनी पक्ष वाढवला. त्यामुळे पालघरमध्ये भाजपने विजय मिळवला नाही, तर ती त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ही जागा जिंकण्याचा निर्धारही व्यक्त केला.
दरम्यान, भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे. नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
कोण आहेत राजेंद्र गावित?
राजेंद्र गावित हे आदिवासी समाजातील मोठा चेहरा आहेत. काँग्रेसमध्ये असताना ते आदिवासी विकास राज्यमंत्री होते. ते मूळचे नंदुरबारचे आहेत. पालघरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 सालची लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढले, मात्र पराभूत झाले. 2016 साली विधानसभा पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता.
28 मे रोजी पोटनिवडणूक
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 18 उमेदवारांनी अर्ज घेतला आहे. पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत असून 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
संबंधित बातम्या :
वनगांच्या मुलाच्या मेसेजला पाचव्या मिनिटाला मी रिप्लाय केला : मुख्यमंत्री
श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी सेना-भाजपच्या चाली
पक्षाने वाऱ्यावर सोडलं, दिवंगत खासदार वनगांच्या कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश
पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं निधन
पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement