एक्स्प्लोर
गुरुदास कामत यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
गुरुदास कामत यांचं काल दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 63 व्या वर्षी निधन झालं. त्यांचं पार्थिव विशेष विमानाने काल मुंबईत आणलं.
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. गुरुदास कामत यांचं काल दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 63 व्या वर्षी निधन झालं. त्यांचं पार्थिव विशेष विमानाने काल मुंबईत आणलं.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी मुंबई विमानतळावर कामतांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यानंतर रात्री त्यांचं पार्थिव चेंबूर येथील घरी ठेवण्यात आलं.
आज सकाळी 8.30 ते 10.30 यावेळेस कामत यांचं पार्थिव घरात अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान रात्रीपासून काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामत यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली आहे. रात्री उशिरा शिवसेना नेते, सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही गुरुदास कामात यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
कामत यांचं निधन झाल्याचं समजताच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी काल दिल्लीतील प्रायमस रुग्णालयात हजेरी लावली.
माजी केंद्रीय मंत्री, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अशी अनेक पदे कामत यांनी भूषवली होती. त्यांच्या निधनाने काँग्रेसमधील सर्वसमावेशक अभ्यासू चेहरा, सच्चा कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
संबंधित बातम्या
काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांचं निधन
काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचं अखेरचं ट्वीट
पाचवेळा विविध पदांचा राजीनामा देऊनही कामतांनी काँग्रेस का नाही सोडली?
नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन, राहुल गांधी यांची ट्विटरवरुन श्रद्धांजली
मुंबई | गुरुदास कामत यांच्या जाण्याने मोठं राजकीय आणि सामाजिक नुकसान : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement