काँग्रेस नेते भाई जगताप यांची अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका
पालघर झुंडबळीसंदर्भात धार्मिक तेढ निर्माण करणारे वृत्त प्रसिद्ध केल्याचा आरोप असलेले ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशा मागणीची याचिका मुंबई हायकोर्टात काँग्रेस नेत्यांनी केली आहे.
मुंबई : पालघरमध्ये झालेल्या झुंडबळीसंदर्भात लोकांची दिशाभूल करणारे आणि समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे वृत्त प्रसिद्ध केल्याचा आरोप असलेले जेष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर फौजदारी कारवाई करावी आणि त्यांच्या वृत्तवाहिनीवरील अशा कार्यक्रमांना बंदी घालावी, अशी मागणी करत युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सूरज ठाकूर आणि काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
पालघरमध्ये दोन साधुंसह तिघांची जमावाने ठेचून निघृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेवर अर्णब गोस्वामी यांच्या वृत्तवाहिवीनर 'पूछता है भारत' हा चर्चासत्राचा एक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात आला होता. यामध्ये संबंधित जमाव अल्पसंख्याक समाजातील असल्याचे व्रुत्त प्रक्षोभक पद्धतीने दाखविण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात हल्लेखोर आणि पीडित हे एकाच समाजातील असल्याचे राज्याच्या गृहमंत्र्यांना जाहीर केले आहे. तसेच आरोपींची नावंही प्रसिद्ध केलेली आहेत. असे असतानाही जाणीवपूर्वक धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हेतूने चुकीचे आणि चिथावणीखोर वृत्त दिले जात आहे, असा आरोप या याचिकेतून केला आहे. तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षावरही या कार्यक्रमात खालच्या स्तरावर उतरत टीका करून निव्वळ राजकीय आकस काढला जात आहे, असाही आरोप याचिकेतून केलेला आहे.
Arnab Goswami | अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाकडून तीन आठवड्यांचा दिलासा
सुप्रिम कोर्टाकडून तीन आठवड्यांचा दिलासा
वृत्तवाहिन्यांवर असेच कार्यक्रम चालू राहिले तर सामाजिक शांतता धोक्यात येऊ शकते, त्यामुळे गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे निर्देश घाटकोपर पोलीस ठाण्याला द्यावे, गोस्वामी यांना त्यांच्या किंवा अन्य कोणत्याही चॅनलवर बोलण्यास तसेच मत व्यक्त करण्यास मनाई करावी, अशीही मागणी या याचिकेतून केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, याच प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामी यांना तीन आठवड्यांचा दिलासा देत अटक अथवा कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
Dr Shekhar Mande | कोरोना व्हायरसविरोधात कशा प्रकारे संशोधन सुरू आहे? डॉ. शेखर मांडेंशी संवाद