एक्स्प्लोर

...तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई डॅशिंग IAS आणि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बांधकामांवर हातोडा उगारला आहे. मात्र त्यांना पुन्हा एकदा राजकारण्यांचा सामना करावा लागतो.  यावेळी नवी मुंबईतील भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी तुकाराम मुंढेंना आव्हान दिलं आहे.   नवी मुंबईतील गावठाणांमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली, तर येत्या पावसाळी अधिवेशनात तुकाराम मुंढेंविरोधात हक्कभंग दाखल करण्याचा इशारा, आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला.   गावठाणांतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. या कारवाईला भाजपने विरोध केला आहे.  तर शिवसेनेना आणि सत्ताधारी राष्ट्रवादीने मात्र सावध भूमिका घेतली आहे.   ...तर तुकाराम मुंढेंविरोधात हक्कभंग आणू मुख्यमंत्र्यांनी गावठाणातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईस स्थगिती दिली असताना, आयुक्त ही कारवाई कशी करतात, असा प्रश्न आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत आपण लवकरच मुंढे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असून, आवश्यकता पडल्यास येत्या अधिवेशनात मुंढे यांच्याविरोधात हक्क भंग आणण्याचा इशाराही मंदा म्हात्रे यांनी दिला आहे.   शिवसेनेची सावध भूमिका महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात अनधिकृत बांधकामावर कारवाई करून, शहराला सुनियोजित करण्याचा प्रयत्न केला आहे. घोटाळे असलेले अनेक टेंडर रद्द करून पालिकेचे करोडो रूपये वाचविल्यामुळे शिवसेनेने त्यांचं  कौतुक केलं.  मात्र जर सर्वसामान्यांच्याविरोधात आयुक्तांची भूमिका कायम राहिल्यास, याबाबत पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे म्हणत, सेनेने सावध भूमिका घेतली आहे.   सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी वेट आणि वॉचची भूमिका घेतली आहे. भविष्यात आयुक्तांवर पालिका सभागृहात अविश्वास ठराव आणायचा की नाही, याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक घेतील असे सोनवणे यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडलेABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget