Mumbai : मुंबईला पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा धोका? दहशतवाद्यांकडे सापडले छबाड हाऊसचे फोटो; पोलीस यंत्रणा सतर्क
Chabad House Photos : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दहशतवादी संशयितांकडून कुलाबा येथील चाबड हाऊसचे गुगल फोटो सापडले आहेत.
![Mumbai : मुंबईला पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा धोका? दहशतवाद्यांकडे सापडले छबाड हाऊसचे फोटो; पोलीस यंत्रणा सतर्क Colaba chabad house images found from terror suspects security upped Maharashtra ATS and mumbao police on alert Mumbai : मुंबईला पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा धोका? दहशतवाद्यांकडे सापडले छबाड हाऊसचे फोटो; पोलीस यंत्रणा सतर्क](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/29/952e4f1a3112b7e02ed6c975c48bfaa71690613672695322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Terrorists : मुंबईतील कुलाबा येथील छबाड हाऊसचे फोटो दहशतवाद्यांकडून सापडल्याने खळबळ माजली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दहशतवाद्यांकडून कुलाबा येथील चाबड हाऊसचे गुगल फोटो सापडले आहेत. यामुळे यंत्रणा संतर्क झाल्या असून छबाड हाऊसच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
दहशतवादी संशयितांकडून छबाड हाऊसचे फोटो
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, कुलाबा येथील छबाड हाऊसचे काही गुगल फोटो संशयित आरोपींकडून सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर छबाड हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. छबाड हाऊसमध्ये आधीच अतिशय उच्च सुरक्षा आहे. गुरुवारी मध्यभागी आणि बाहेरील भागात एक मॉक ड्रिल देखील घेण्यात आली, अशी माहिती कुलाबा पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोलाबामधील छबाड हाऊसवर सुरक्षा
26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या लक्ष्यांपैकी एक असलेल्या छबाड हाऊसचे गुगल फोटो (Google Photo) दहशतवाद्यांकडे सापडले आहेत. या दोन आरोपींना हल्ल्याचा कट रचल्याबद्दल राजस्थानमधून अटक करण्यात आली. दरम्यान, या घडामोडीनंतर पोलिसांनी कुलाबा येथील ज्यू कम्युनिटी सेंटरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मुंबई पोलिसांना या संदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलिसांकडून मॉकड्रीलही सुद्धा घेण्यात आलं.
दोन दहशतवादी एटीएसच्या ताब्यात
एटीएसने काही दिवसांपूर्वी मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. हे दोघेही राजस्थानमधील रतलाम येथील असून ते आता महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात आहेत. या दोन्ही आरोपींवर NIA कडून पाच लाख रुपये बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलेली होतं. त्याचबरोबर हे आरोपी अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा तपासात निष्पन्न सुद्धा झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)