एक्स्प्लोर

CM Uddhav Thackeray on Shiv Sena Vardhapan Din : आईचं दुध विकणारा शिवसेनेत नको, उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांचा दाखला देत दगाबाजीवर सूचक इशारा

मला उद्याच्या निवडणुकीची मला अजिबात चिंता नाही, राज्यसभा निवडणुकीत मत फुटलेलं नाही. कुणी काय कलाकाऱ्या केला हे कळालं असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.

Shiv Sena Vardhapan Din LIVE : शिवसेनेच्या 56 व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सूचक शब्दात भाष्य करताना भाजपवर कडाडून हल्ला चढवला.  मला उद्याच्या निवडणुकीची मला अजिबात चिंता नाही. शिवसेनेमध्ये गद्दार कोणी राहिलेला नाही, राज्यसभा निवडणुकीत मत फुटलेलं नाही. कुणी काय कलाकाऱ्या केला हे कळालं असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. आईचं दूध विकणारा शिवसेनेत नको, असे बाळासाहेबांचे शब्द सांगत  त्यांनी गद्दारी करणाऱ्यांना सूचक इशारा दिला. 

मुख्यमंत्र्यांनी आमदारांना संबोधित करताना शिवसेना स्थापनेवेळच्या अनेक आठवणींना उजाळा देत भाषणाला सुरुवात केली. माझा पक्षच हा पितृपक्ष असूनकारण माझ्या पित्याने स्थापन केल्याचे सांगत पितृपक्ष मानत नसल्याचे सांगितले.  ते म्हणाले की, शिवसेना स्थापनेचा क्षण मनात आठवून गेला. शिवसेना स्थापनेवेळी माझे वय 6 होत. शिवसेना आजवर कणखरपणे उत्तर देत आली आहे आणि देत राहू. 56 वर्षात शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं आहे. पक्षासाठी वार झेलणाऱ्यांना विनम्र अभिवादन करत असल्याचे ते म्हणाले. 

आमदारांना हाॅटेलात ठेवणं हीच आजची लोकशाही  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना हाॅटेलमध्ये ठेवण्यावरूनही भाष्य केले. नाही म्हटलं, तरी आमदारांची बडदास्त ठेवावी लागते, यालाच लोकशाही म्हणत असल्याचे खोचक शब्दात सांगितले. राज्यसभा निवडणुकीत एकही मत फुटलं नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीची चिंता नसल्याचे ते म्हणाले. कितीही फाटाफूट झाली, तरी शिवसेना ताकदीने उभी राहिली आहे. आईचा दुध विकणारा शिवसेनेत नकोत हे बाळासाहेबांचे वाक्य फार महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. 

गाडी चालवायला, रंधा मारायला शिकवणार आणि नाव अग्निवीर

अग्निपथवरुन देशभरात सुरु असलेल्या हिंसक संघर्षावरून त्यांनी मोदी सरकारवर चांगलाच हल्ला चढवला. देशातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत, त्यांची माथी का भडकवली गेली ? कोणी भडकवली त्यांची माथी? हृदयात राम आणि हाताला काम हेच चित्र देशात दिसत आहे. हृदयात राम आहेच, पण प्रत्येकाला दाखवता येणार नाही. हाताला काम नसेल तर राम राम करून काहीच फायदा होणार नाही. सुरुवातीला नोटाबंदी झाली. लोकांमध्ये भीती असल्याने निर्णय पचून गेला. शेतकरी कायदे आले, पण नाईलाजाने सरकारला एक पाऊल मागे जावे लागले. वचने अशी द्या जी पूर्ण झाली पाहिजेत. शिवसेनेने जे जे वचन दिलं ते पूर्ण केलं आहे. दोन कोटी नोकऱ्या देऊ म्हणाले, पण काहीच दिलं नाही. एखादी योजना आणायची अग्निवीर, अग्निपथ योजना. शिकवणार सुतार काम. गाडी चालवायला शिकवणार. रंधा मारायला शिकवणार आणि नाव अग्निवीर, अशी बोचरी टीका त्यांनी केली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Embed widget