एक्स्प्लोर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं जनतेला संबोधन, कोरोना, कांजूरमार्गसह भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं.मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे
मुंबई : कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. कोविड सुरू झाला तेंव्हा भेटींची वारंवारता जास्त होती. मी आजपर्यंत जे काही सांगत आलो ते आपण मनापासून अंमलात आणत गेलात, त्यामुळे आपण नियंत्रण मिळवले आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे
- समृद्धी मार्गावरचा नागपूर - शिर्डी टप्पा एक महिन्यात पूर्ण होईल. आर्थिक संकटातही विकासकामे सुरु आहेत. आर्थिक चणचण आहे, केंद्राकडून पैसे येणे बाकी आहे. धीम्या गतीने येत आहेत परंतु आपण हताश होऊन बसलो नाही, पुढे जात आहोत.
- मला अहंकारी संबोधले जाते... माझ्या महाराष्ट्रासाठी आहे मी अहंकारी! का नसावं? जे जनतेच्या हितासाठी, ते करण्याचा प्रयत्न करत आहे.
- राजकीय हल्ले परतवत एक वर्ष यशस्वीपणे पूर्ण केलं. 28 नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारने आपल्या साथीने आणि आशीर्वादाने एक वर्ष पूर्ण केलं. अनेकजण डोळे लावुन बसले होते आता पडेल... मग पडेल. परंतु विकास करत आपण एक वर्ष पूर्ण केलं. ते देखील जागतिक शतकाने येणार्या आपत्तीच्या काळात!
- लग्नसराई सुरू झाली की 'यायच हं!' असं आमंत्रण द्यायची पद्धत आहे. परंतु हे आमंत्रण आपण कोरोनाला तर देत नाही ना? याची सावधानता बाळगा. आपण बाहेर जात असाल तर मास्क हे सार्वजनिक क्षेत्रात आपले संरक्षण करणारे शस्त्र आहे.
- नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन कायद्याने लावू शकतो. परंतु धन्यवाद द्यायचे आहेत कारण बहुतांशी लोक सूचनाचे पालन करत आहेत. 70-75 टक्के लोक पालन करत आहेत परंतु उर्वरित लोकांमुळे हे खबरदारी घेणारे देखील धोक्यात. परदेशातुन येणार्या प्रवाशांच्या टेस्ट थांबवा असे लोक म्हणत आहेत, परंत कसं थांबवायचं? आपण धिम्या गतीने पुढे जात आहोत. सावधपणे पावले उचलत आहोत. अनुभवातुन आपल्याला शहाणपण आलेलं आहे.
- कोरोनाने आता रुप बदलले आहे. आर नॉट असे त्याला टेक्निकल भाषेत संबोधतात. काळासोबत बदला म्हणतात तसं व्हायरसने रुप बदललं आहे. युरोपमध्ये कडक लॉकडाऊन आजपासून का करावा लागला? त्याची कारणे आहेत. सण गेले परंतु आता न्यू ईअर येत आहे.
- देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धनजींनी सांगितलं आहे की व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल. त्यामुळे माझ्या मते 6 महिने तरी मास्क लावावा लागेल.
- पावसापूर्वी पेरता पक्षी येतो आणि पेरणीची साद घालतो त्याचप्रमाणे प्रत्येक पावलावर मी तुम्हाला सावध रहा सांगत आलो आहे. कोविड सुरू झाला तेंव्हा भेटींची वारंवारता जास्त होती... मी आजपर्यंत जे काही सांगत आलो ते आपण मनापासून अंमलात आणत गेलात, त्यामुळे आपण नियंत्रण मिळवले आहे.
- केवळ एका लाईनसाठी आरे मध्ये कारशेड का? कांजुरची 40 हेक्टर जागा आहे, म्हणजे 25 आणि 40 असा फरक आहे. कांजुरचा गवताळ किंबहुना ओसाड जागा आहे. कांजुरला 3 - 4 - 6 या तीन लाईनसाठी आपण कारशेड करू शकतो.
- प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण केला तर आपल्याला खुर्चीत बसण्याचा अधिकार नाही. मी ज्या खुर्चीत बसलोय, त्या खुर्चीच महत्त्व मला माहित आहे. वैयक्तिक आवड-निवड ठेवत नाही, हट्टीपणा नाही, परंतु विकासकामांसाठी पाठपुरावा मी करणारच.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement