एक्स्प्लोर

छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूटला 17 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी

Salim fruit : छोटा शकीलचा (Chota Shakeel) साडू मोहम्मद सलीम मोहम्मद इक्बाल कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट याला 17 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा (Chota Shakeel) साडू मोहम्मद सलीम मोहम्मद इक्बाल कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट याला 17 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. सलीमवर बिल्डरांकडून जबरदस्तीने फ्लॅट विकून पैसे दाऊदला दिल्याचा आरोप आहे. सलीम याला काल अटक करण्यात आली होती. 

सलीमच्या विरोधात एनआयएकडे पाच बिल्डरांनी आपली बाजू मांडली आहे. एनआयए सलीमच्या खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करणार आहे. सलीमच्या घरात इतर अनेक लोकांच्या मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. याबरोबरच 
सलीमच्या घरी लाखो रुपयांच्या विदेशी तस्करीच्या सिगारेट देखील सापडल्या आहेत.

सलीमशी संबंधित सुमारे 10000 पानांची कागदपत्रे आहेत. यामध्ये टेरा बाइट डेटाचा समावेश आहे. याबद्दल सलीमची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याची कोठडी मिळावी अशी मागणी, एनआयएने केली होती. 

कोण आहे सलीम फ्रुट?

कौटुंबिक नात्यामुळे सलीम फ्रूट छोटा शकीलच्या अगदी जवळ आहे. छोटा शकील त्याला आपल्या मुलाप्रमाणे वागवतो. छोटा शकीलच्या पत्नीच्या धाकट्या बहिणीशी सलीमचा विवाह झाला आहे. सलीमचे वडील उमर कुरेशी हे मुंबईतील नल बाजार परिसरात फळे विकायचे. त्यामुळे सलीमला सलीम फ्रूट म्हणून संबोधले जाते.

 या टोळीत सामील होण्यापूर्वी सलीम दुबईला फळे निर्यात करायचा. दुबईमध्ये त्याचा एक आलिशान बंगला देखील आहे. सलीमविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 दरम्यान, एनआयएने मुंबईतील माहीम भागातील सुहेल खंडवानी यांच्या घरावर छापा टाकला होता. खांडवानी हे मुंबईतील माहीम दर्गा आणि हाजियाली दर्ग्याचे विश्वस्त आहेत. घरावर छापा टाकल्यानंतर एनआयएचे अधिकारी त्यांना माहीम येथील त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले आणि तेथेही त्यांची चौकशी करण्यात आली.

या प्रकरणात  NIA ने अब्दुल कय्युम नावाच्या व्यक्तीची देखील चौकशी करत आहे, जो 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी होता. परंतु, नंतर खटल्याच्या वेळी पुराव्याअभावी विशेष टाडा न्यायालयाने सर्व आरोपातून त्याला निर्दोष मुक्त केले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या

Embed widget