एक्स्प्लोर
‘नानावटी रुग्णालयाच्या ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल करा!’
नानावटी रुग्णालयाच्या ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश धर्मदाय आयुक्त शिवकुमार दिघे यांनी दिले आहेत.
मुंबई : नानावटी रुग्णालयाच्या ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश धर्मदाय आयुक्त शिवकुमार दिघे यांनी दिले आहेत. राज्य सरकारच्या सवलती रुग्णांना मिळत नसल्याचं पाहून दिघे यांनी ट्रस्टींवरोधात कारवाईचे आदेश दिले आहे.
काही दिवसांपूर्वी शिवकुमार दिघे यांनी नानावटी रुग्णालयात स्टिंग ऑपरेशन केलं होतं. राज्य सरकारकडून वेगवेगळ्या सवलतींमध्ये गरीबांना सेवा मिळते का? याची पाहाणी करण्यासाठी ते स्वत: रुग्ण बनून रुग्णालयात एक तासभर फिरले. मात्र त्यांना रूग्णालय प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही.
त्यामुळे या प्रकरणी विश्वस्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. जे रुग्णालय सरकारकडून सवलती घेऊन गरीब रुग्णांना सेवा नाकारतात, त्यांच्या विरोधात धर्मदाय आयुक्तांची कारवाईचा बडगा उगारला आहे.
मात्र, आज रुग्णालयाच्या ट्रस्टींविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश आयुक्तानी दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement