एक्स्प्लोर

केंद्रीय पथकाची ठाण्यात पाहणी, मृत्युदर कमी करण्याचे आदेश

ठाणे महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राचे आरोग्य पथक आज ठाणे जिल्ह्याच्या पाहणीसाठी आले होते. यावेळी मृत्युदर कमी करण्यावर भर देण्याच्या सूचना केंद्रीय पथकाने दिल्या आहेत.

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि ठाणे जिल्ह्यात covid-19 च्या रुग्णांची वाढती संख्या पाहून आज केंद्रीय आरोग्य पथकाने ठाणे महानगरपालिकेतील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांची आढावा बैठक घेऊन ठाणे जिल्ह्यात कशाप्रकारे उपाययोजना केल्या गेल्या आहेत याची माहिती घेतली. या पथकाचे प्रमुख होते केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल. तसेच राज्यातील आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास देखील या पथकासोबत उपस्थित होते.

या पथकातील सदस्यांनी महानगरपालिकांना मृत्यूदर कमी करण्याला जास्तीत जास्त प्राधान्य द्या, अशा सूचना दिल्या. तसेच जास्तीत जास्त चाचण्या करा जेणेकरुन रुग्णांवर लवकरात लवकर उपचार करता येतील अशाही सूचना दिल्या. वाढती रुग्णसंख्या पाहून घाबरुन न जाता लोकांना वेळेत उपचार घेण्यासाठी उपाय योजना आणि त्याची अंमलबजावणी करा, असेही केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील महानगरपालिकांच्या आयुक्तांना सांगितले.

कोरोना संकटात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिसांना शौर्य पुरस्कार देणार; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

कोविड रुग्णालयाला भेट सुरुवातीस केंद्रीय पथकाने मुंब्रा येथील अमृतनगर, इन्शानगर येथील प्रतिबंधित लोकांची पाहणी करुन तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाला भेट देवून डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी बाळकूम साकेत येथील 1000 बेडचे ठाणे कोविड रुग्णालयाची पाहणी करुन सोयी-सुविधांचा आढावा घेतला. दिल्लीवरुन आलेले हे पथक विमानतळावरुन थेट मुंब्रा येथे दाखल झाले. ठाणे शहरातील पाहणी करुन मग त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी ठाणे पोलिसांसह आयुक्त डॉ. मेखला, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी, मीरा भायंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. राठोड, उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त दयानिधी असे सर्व अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय पथकाची ठाण्यात पाहणी, मृत्युदर कमी करण्याचे आदेश

मृत्युदर कमी करण्यावर भर देण्याच्या सूचना

सद्यस्थितीत कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी त्यामुळे घाबरुन न जाता त्याचे योग्य व्यवस्थापन करून मृत्युदर कमी करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी या आढावा बैठकीत दिल्या. त्याचप्रमाणे चाचण्यांची क्षमता वाढवावी जेणेकरुन बाधित लोकांना वेळेवर उपचार देता येतील. त्याचप्रमाणे कोविडची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांशी समन्वय साधून त्यांना मदत करा, असेही यावेळी लव अग्रवाल यांनी सांगितले. सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेत रुग्णांची संख्या लवकरच आठ हजारांपर्यंत पोहोचेल. तर ठाणे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या तीस हजारांचा टप्पा पार करेल. तर एकूण मृतांचा आकडा देखील 900 च्या पुढे पोहचला आहे. त्यामुळे मुंबईनंतर सर्वात बिकट परिस्थिती ठाणे जिल्ह्यात निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.

Ajit Pawar PC | काहीही झालं तरी राज्याला या संकटातून बाहेर काढायचं : अजित पवार

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले
CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले
Raj Thackeray on Delhi CJP Protest: या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Embed widget