एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पश्चिमसोबतच मध्य रेल्वेसाठीही येत्या वर्षात नवीन सहा एसी लोकल
कायम सेकंड हँड लोकल मिळत असल्याची मध्य रेल्वेवरील प्रवाशांची रडरड आता थांबेल, कारण येत्या वर्षात बारा लोकल मुंबईत दाखल होत असून त्यापैकी सहा नव्या कोऱ्या लोकल मध्य रेल्वेवर धावतील
मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या वर्षात मध्य रेल्वेला सहा नव्या एसी लोकल मिळणार आहेत. मध्य रेल्वेवर कायम अन्याय होत असल्याची प्रवाशांची भावना, या निमित्ताने दूर होईल.
येत्या वर्षात मुंबईत 12 एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यांची समसमान वाटणी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर होणार आहे. म्हणजेच सहा लोकल मध्य, तर सहा लोकल पश्चिम रेल्वेला देण्यात येणार आहेत.
नवी एसी लोकल! एका डब्यातून दुसऱ्यात जाण्यास मार्गिका
रेल्वे बोर्डाचं पत्र 'एबीपी माझा'च्या हाती लागलं आहे. त्यानुसार सर्व नवीन लोकल थेट मध्य रेल्वेला मिळतील. आधी पश्चिम रेल्वेकडून मग मध्य रेल्वेला सेकंड हँड गाड्या मिळत होत्या, मात्र आता तसं होणार नाही. राजधानी मध्य रेल्वेवर मध्य रेल्वेसाठी आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणजेच पहिल्यांदाच मध्य रेल्वे मार्गावरुन राजधानी एक्स्प्रेस धावणार आहे. गेली अनेक दशकं पश्चिम रेल्वेवरुन दोन राजधानी एक्स्प्रेस दिल्लीला जात आहेत. मात्र आता मध्य रेल्वेवरुन राजधानी सुटणार आहे.EXCLUSIVE PHOTO | मुंबईसाठी नवीन एसी लोकलचं उद्घाटन
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी यासंबंधी आज घोषणा केली. राजधानी एक्स्प्रेस सीएसएमटीहून सुटेल आणि कल्याण, नाशिक, जळगाव, खांडवा, भोपाळ, झांसी, आग्रा आणि हजरत निझामुद्दीन या मार्गे जाईल. पहिल्यांदाच गुजरात ऐवजी मध्य प्रदेशमार्गे राजधानी धावणार आहे. यानिमित्ताने अनेक वर्षांपासून असलेली मागणी पूर्ण झाली आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement