Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक
Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेच्या उपनगरीय विभागांच्या दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. उद्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असेल.
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी म्हणजेच 13 नोव्हेंबर 2022 रोजी मेगाब्लॉक (Mega Block) असणार आहे. मध्य रेल्वेकडून (Central Railway) याबाबत माहिती देण्यात आली आहे. देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे.
Mega Block on 13.11.2022 https://t.co/m2zFocrFtV
— Central Railway (@Central_Railway) November 11, 2022
रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड या अप आणि डाऊन फास्ट मार्गावर सकाळी 11 : 05 पासून ते दुपारी 3 .55 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी 10.25 ते 3.35 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणार्या फास्ट गाड्या माटुंगा गे मुलुंड मार्गावरील स्लो मार्गावर वळवण्यात येणार आहेत. शिवाय ठाण्याच्या पुढे फास्ट गाड्या या 15 मिनिटे उशीराने धावतील.
हार्बर रेल्वे मार्गावर देखील मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गोरेगाव ते पनवेल आणि बेलापूर या अप मार्गावर सकाळी 10.33 ते दुपारी 3. 49 पर्यंत मेगाब्लॉक असेल. शिवाय पनवेल, बेलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 दरम्यान मेगाब्लॉक असेल. या वेळेत लोकल सेवा बंद राहणार आहे. मेगाब्लॉकच्या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्यान काही विशेष गाड्या धावतील.
ट्रॅक, सिग्नलिंग सिस्टीम आणि ओव्हरहेड उपकरणांच्या दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेवर शनिवार 12 नोव्हेंबर आणि रविवार 13 नोव्हेंबर रोजी वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर 11.50 ते 02.50 आणि जलद मार्गांवर 01.30 ते 04.30 पर्यंत रात्रीचा ब्लॉक असेल.
Kind Attention Passengers...!
— Western Railway (@WesternRly) November 12, 2022
Some WR trains will be affected due to power block between Vangaon and Dahanu Road on 12th & 13th November 2022 from 09.40 hrs to 10.40 hrs. in connection with DFCCIL work : @RailMinIndia @drmbct @m_indicator @mumbairailusers
महत्वाच्या बातम्या