Mumbai Mega Block Local Updates: मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा, मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम वेळेआधीच पूर्ण
Mumbai Mega Block Local Updates: ठाणे स्थानकात स्थानकात तासांच्या मेगाब्लॉकला मध्यरात्रीपासूनच सुरूवात झालीय. मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.
LIVE
Background
Mumbai Mega Block Local Updates: ठाणे स्थानकात स्थानकात 62 तासांच्या मेगाब्लॉकला मध्यरात्रीपासूनच सुरूवात झालीय. मुंबईहून कल्याणकडे जाणाऱ्या फास्ट मार्गावर 62 तासांचा तर मुंबईकडे जाणाऱ्या स्लो मार्गावर 12 तासांचा हा मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर यामुळे वेळापत्रक कोलमडलंय. गाड्यात 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत. आज कामाचा दिवस असल्याने ऑफिसला जाणाऱ्यांचे हाल सुरू झालेत. कल्याण डोंबिवली ठाणे या प्लॅटफॉर्मवर गर्दी आहे. सकाळची कामाची वेळ, उकाडा आणि गाड्या उशिरा यामुळे प्रवासी हैराण झालेत. आज मध्य आणि हार्बर मार्गावरील 161 लोकल रद्द आहेत, सध्या ठाणे स्थानकात 20 मिनिटांनी एक अशी मुंबईकडे जाणारी लोकल येत आहे. एकच ठिकाणी फास्ट आणि स्लो लोकल येत असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ आहे, दुपारनंतर जेव्हा ठाणे स्थानकात मुंबईकडे जाणारा स्लो ट्रॅक सुरू होईल तेव्हा यात फरक पडेल.
Central Line: मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा, मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम वेळेआधीच पूर्ण
Central Line: मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा... मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम वेळेआधीच पूर्ण झाले आहे. मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरून वाहतूक सुरू झाली आहे.
ST Buses : मुंबईसाठी पुणे एसटी विभागाकडून जादा गाड्या
ST Buses : मुंबईसाठी पुणे एसटी विभागाकडून जादा गाड्या
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द
पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी 40 जादा बसेस
रेल्वे गाड्या रद्द असल्याने एसटीवर पडणार प्रवाशांचा ताण
याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून जादा गाड्याचं नियोजन
मुंबईसाठी पुणे स्टेशन येथून 40 जादा बसेस सोडण्यात येणार
Mega Block: 'मेगाब्लॉकबाबत पूर्व कल्पना द्यायला हवी होती', प्रवासी संघटनेची मागणी
Mega Block: मुंबईतील जम्बो मेगाब्लॉकबाबत रेल्वे प्रशासनानं आधीच पूर्व कल्पना द्यायला हवी होती, तसंच सर्व प्रवासी संघटनांसोबत बैठका घेऊन चर्चा करायला हवी होती, मध्य रेल्वे महासंघ प्रवासी संघटनेच्या सरचिटणीस लता अरगडे यांची प्रतिक्रिया.
Mulun Airoli Traffic Updats : ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मुलुंड -ऐरोली मार्गावर वाहतूक कोंडी
Mulun Airoli Traffic Updats : ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मुलुंड -ऐरोली मार्गावर वाहतूक कोंडी झालीय. ट्रेलर घसरल्यामुळे मुंबई कडून ( ऐरोली ) उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.एक ते दीड किलोमीटर गाड्यांचे रांग...आधीच ट्रेन्स नाही आणि नवी मुंबईला जाण्यासाठी प्रचंड वाहतूक कोंडी..
Mumbai Traffic: मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी
मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर पूर्वद्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. आपल्या खाजगी वाहनाने मुंबईकर हे कामाच्या दिशेने निघालेले आहेत. त्यामुळे मुलुंड ते कांजूरच्या दरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.
Mumbai Traffic Update: मध्य रेल्वे वरील जम्बो ब्लॉक च्या पार्श्वभूमीवर पूर्वद्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी https://t.co/RWOzapozYk #megablock #Mumbaitraffic pic.twitter.com/7lpjqdyKlE
— ABP माझा (@abpmajhatv) May 31, 2024