एक्स्प्लोर
Advertisement
वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती
बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान बंधु कुटुंबासोबत लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं होतं. वाधवान कुटुंबियांचा क्वॉरन्टाईन काळ 23 तारखेला संपल्यानंतर अखेर आज धीरज आणि कपिल वाधवान या बंधूंना सीबीआयने आपल्या ताब्यात घेतलं आहे.
मुंबई : साताऱ्यात असलेल्या वाधवान कुटुंबियांचा क्वॉरन्टाईन काळ 23 तारखेला संपल्यानंतर अखेर आज धीरज आणि कपिल वाधवान या बंधूंना सीबीआयने आपल्या ताब्यात घेतलं आहे. सीबीआयने सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतलं असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करत दिली आहे. वाधवान कुटुंबाचा क्वॉरन्टाईन काळ संपल्यानंतर आम्ही ईडी आणि सीबीआयला पत्र लिहून त्यांचा ताबा घेण्याची विनंती केली आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी 22 एप्रिलला दिली होती. अखेर आज वाधवान बंधूंना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे.
अमिताभ गुप्तांचा चौकशी अहवाल आज किंवा उद्या येणार बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान बंधु कुटुंबासोबत लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं होतं, महत्त्वाचं म्हणजे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला गाडीतून प्रवास केला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. अमिताभ गुप्ता यांचा चौकशी अहवाल आज किंवा उद्या येणार असल्याचं देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. ॲडिशनल चीफ सेक्रेटरी मनोज सौनिक या प्रकरणी चौकशी करत आहेत. त्यांचा अहवाल आज किंवा उद्या मिळणार असल्याचे देशमुख यांनी सांगितलं आहे.A #CBI team has taken both Kapil and Dhiraj Wadhwan into custody.@SataraPolice has given them all required assistance & an escort vehicle with 1+3 guard upto Mumbai on a written request. The arrest procedures are going on.#LawEqualForAll
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 26, 2020
लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाचा महाबळेश्वरपर्यंत प्रवास बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान बंधु कुटुंबासोबत लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं. महत्त्वाचं म्हणजे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला गाडीतून प्रवास केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल झाला होता. परंतु वाधवान कुटुंबाला सीबीआयने ताब्यात घेतलं नव्हतं. वाधवान कुटुंबापैकी काही जणांना कोरोनाव्हायरसची लागण झालेली असू शकते, अशी शंका असल्याने सीबीआयने अख्ख्या कुटुंबाला क्वॉरन्टाईन करण्याचा निर्णय घेतला होता. शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला गृह सचिवांकडून परवानगी पत्र मिळणं अशक्य : किरीट सोमय्या कपिल वाधवान, धीरज वाधवान रियल इस्टेट कंपनी एचडीआयएल (HDIL), फायनान्स कंपनी डीएचएफएल (DHFL) सह अनेक कंपन्यांचे मालक आहेत. वाधवान बंधु डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्याप्रकरणी जामीनावर बाहेर आहे. याशिवाय वाधवान बंधु पीएमसी बँक घोटाळ्यातही आरोपी आहेत. कोणाच्या आदेशाने किंवा आशीर्वादाने वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये? मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं : देवेंद्र फडणवीस स्थानिकांच्या तक्रारीनंतर वाधवान कुटुंब ताब्यात वाधवान कुटुंब मुंबईच्या वांद्र्यातील पाली हिल परिसरातं राहतं. मुंबईहून हे कुटुंब महाबळेश्वरमध्ये पोहोचलं असता, स्थानिकांनी 23 जणांना पाहून याचा विरोध केला आणि लॉकडाऊनदरम्यान हे लोक महाबळेश्वरला कसे पोहोचले. काही रहिवाशांनी याची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये केली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महाबळेश्वरमध्ये पोहोचलेल्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या वाधवान कुटुंबातील सर्व सदस्यांना विलग करण्यात आलं आहे. महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्यांमध्ये कुटुंबातील महिला आणि मुलांचाही समावेश आहे. विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबातील 23 जण सात गाड्यांमधून मुंबईहून महाबळेश्वरला गेल्याचं उघडं झालं. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांचं पत्र मिळालं. यानंतर वाधवान कुटुंबीयांना प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. लॉकडाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला, गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र मिळाल्याने खळबळ 'त्या' 23 जणांमध्ये कुणाचा समावेश? कपिल वाधवान अरुणा वाधवान वनिता वाधवान टीना वाधवान धीरज वाधवान कार्तिक वाधवान पूजा वाधवान युविका वाधवान अहान वाधवान शत्रुघ्न घागा मनोज यादव विनीद शुक्ला अशोक वाफेळकर दिवाण सिंग अमोल मंडल लोहित फर्नांडिस जसप्रीत सिंह अरी जस्टीन ड्मेलो इंद्रकांत चौधरी प्रदीप कांबळे एलिझाबेथ अय्यापिल्लई रमेश शर्मा तारकर सरकारॲडिशनल चीफ सेक्रेटरी #ManojSaunik यांचा #amitabhgupta प्रिन्सिपल सेक्रेटरी होम (Special) यांच्याबद्दलचा इन्क्वायरी रिपोर्ट आज किंवा उद्या मिळणार.#LawEqualForAll
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 26, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement