कोरोना बाधित रुग्णांवर उपचारांसाठी जास्त पैसे घेतल्याने नानावटी रुग्णालयावर गुन्हा; मुंबई महापालिकेची कारवाई
कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी जास्त पैसे घेतल्याने मुंबई महापालिकेने नानावटी रुग्णालया विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वारंवार सूचना करुनही खाजगी रुग्णांलयाकडून रुग्णांची लूट सुरू आहे. त्यामुळेच आता प्रशासनाने अशा रुग्णांलयांविरोधात आक्रमक पवित्रा घ्यायला सुरुवात केली आहे.
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र सुरू झाला आणि खाजगी रुग्णालयांची लूट समोर येऊ लागली. खाजगी रुग्णालयांच्या या लुटी विरोधात शासनाने वेळोवेळी नियमावलीही आखली. पण तरीसुद्धा काही खाजगी रुग्णालयाने या नियमावली धुडकाववल्याचं समोर आलं. अशाच रुग्णालय विरुद्ध आता महानगरपालिकेने आपली कारवाई कठोर केली आहे.
मुंबईच्या नानावटी रुग्णालया विरोधात महानगरपालिकेने सांताक्रूझ पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंदवला आहे. शासनाने आखून दिलेल्या नियमावलीला धुडकावून कोविड 19 (covid-19) रुग्णांवर उपचार करण्याकरिता जादा बिल घेतल्या संदर्भात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नानावटी विश्वस्त मंडळावर गुन्हा नोंदवण्यात आला असून याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. नानावटी रुग्णालया विरोधात गुन्हा दाखल
महानगरपालिकेला माहिती मिळाली होती की नानावटी रुगनालयात कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यांच्याकडून जास्त पैसे घेतले जात आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नानावटी रुग्णालयात पाहणी केली. कोरोना संक्रमित रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णांना देण्यात आलेली बिलांची तपासणी महापालिकेने आपल्या ऑडिटर मार्फत केली. याच्यामध्ये त्यांना तफावत सापडली आणि त्यांना मिळालेली माहिती खरी आढळली. ज्यानंतर महापालिकेने 1 जुलै रोजी सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला.
कोविड रुग्णालयात नातेवाईकांना प्रवेश, रुग्णांना भेटण्यासाठी विशेष जागा करणार : राजेश टोपे
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा ज्या खाजगी रुग्णालयांकडून कोणाच्या उपचारासाठी जास्त पैसे घेतले जात आहेत. अशा रुग्णालयाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी दिले होते. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन यासंदर्भात पाहणी केली होती. तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा अशाच प्रकारे सरप्राईज भेट देऊन खाजगी रुग्णालयात पाहणी केली होती. जेणेकरुन रुग्णांचे होत असलेली लूट कुठेतरी थांबावी. कोरोना विषाणू संसर्गा विरोधात सध्या रुग्णालये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र, नानावटी रुग्णालयाने केलेल्या कृत्यामुळे कुठेतरी गालबोट लागल्याची टीका होत आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयांची विश्वासार्हता होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमच्याकडे अद्याप तक्रार आलेली नाही कोविड 19 संसर्गाच्या संकटात नानावटी रुग्णालय आघाडीवर लढत आहे. नानावटी पहिलं खाजगी रुग्णालय आहे, ज्याने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या रुग्णालयता 15 कोविड बेड्स असून 42 आयसीयू बेड्स आहेत. कोरोना विरोधातील युद्धात आम्ही आमचा एक कर्मचारी गमावला आहे. सोबतचं रुग्णालयाचे सीईओना देखील कोरोनाची लागल झाली आहे. आमच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. मात्र, आम्हाला याची अद्याप कॉपी मिळाली नाही. आम्ही प्रशासनाला यात संपूर्ण सहकार्य करू.Covid Symptoms | कोविडची तीन नवी लक्षणं समोर, अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलची माहिती