एक्स्प्लोर

जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढणार? सिंधी समाजाविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल

NCP MLA Jitendra Awhad: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सिंधी समाजाविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जितेंद्र आव्हांडांविरोधात सिंधी समाजानं एफआयआर (FIR) दाखल केला आहे. भारतीय सिंधी सभेकडून जिंतेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. सिंधी समाजाच्या बदनामीप्रकरणी मुंबईच्या खार पोलीस स्थानकात, तसेच उल्हासनगरमध्येही (Ulhasnagar) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र सिंधी बांधवांमध्ये मॉर्फ केलेला व्हिडिओ प्रसारीत करुन त्यांना जितेंद्र आव्हाडांविरोधात भडकवलं जात असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमधील गोल मैदान परिसरात 27 मे रोजी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सिंधी समाजाविरोधात वक्तव्य करणं त्यांना भोवलं आहे. याप्रकरणी आमदार आव्हाड यांच्याविरोधात भारतीय सिंधी सभेनं मुंबईतील खार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तसेच, भारतीय जनता पार्टीचे उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष जमनादास खूबचंद पुरूसवाणी यांच्या तक्रारीवरून हिल लाईन पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उल्हासनगर येथे उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष पंचम कालानी यांनी कार्यकत्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीला माजी मंत्री जितेंद्र आव्हाड मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. या आढावा बैठकीत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना सिंधी समाजाबाबत एक वक्तव्य केलं. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे सिंधी धर्मियांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत, असा उल्लेख भाजप नेते जमनादास खूबचंद पुरूसवाणी यांनी तक्रारीत केला आहे. 

उल्हासनगर शहरातील सिंधी समाजाच्या अनुयायांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाडांचं आक्षेपार्ह्य वक्तव्याचा कथित व्हिडीओ सर्व सोशल मिडीया माध्यमांवर व्हायरल करण्यात आला आहे. दरम्यान, उल्हासनगर इथं कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाला उद्देशून जे वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य सिंधी समाजाचा अपमान करणारं असल्याचं सांगत यावर सिंधी समाजानं आक्षेप घेतला. तसेच, याविरोधात ठाण्यातील सिंधी समाजानं कोपरी इथं एकत्र येत आव्हाडांचा निषेध नोंदवला. तसेच जोपर्यंत तो समाजाची माफी मागत नाहीत, तोपर्यंत विविध संविधानिक मार्गानं त्यांचा निषेध नोंदवला जाईल, अशी भूमिका तक्रारदारांनी घेतली आहे.

व्हिडीओ मॉर्फ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादीची मागणी 

सिंधी बांधवांमध्ये मॉर्फ केलेला व्हिडीओ प्रसारीत करुन त्यांना जितेंद्र आव्हाडांविरोधात भडकवलं जात असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. व्हिडीओ मॉर्फ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिसांना देण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
FDA Action On Mumbai Hotel: मुंबईतील आणखी 4 हॉटेलवर FDA ची कारवाई, परवाना निलंबित; कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
मुंबईतील आणखी 4 हॉटेलवर FDA ची कारवाई, परवाना निलंबित; कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Embed widget