एक्स्प्लोर
तरुणीने ब्रेकऐवजी अॅक्सिलेटर दाबलं, कारने 5 जणांना उडवलं!
वकिलीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेली ध्रुवी जैन ही कार चालवत होती, तर तिच्यासोबत तीन मैत्रीही कारमध्ये होत्या. या सगळ्या वांद्रे येथे जात असताना धारावीत हा अपघात झाला.

मुंबई : कारच्या ब्रेकऐवजी अॅक्सिलेटर दाबल्याने मुंबईतील धारावीत अपघात झाला. यात पाच जण जखमी झाले असून, जखमींमध्य एका चिमुकल्याचाही समावेश आहे. ध्रुवी जैन या 19 वर्षीय तरुणीने सिग्नल लागल्याने कारवर ताबा मिळवण्यासाठी ब्रेक दाबण्याऐवजी अॅक्सिलेटर दाबलं आणि पाच जणांना जोरदार धडक दिली. जीवितहानी झाली नाही, मात्र पाच जण जखमी झाले आहेत. वकिलीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेली ध्रुवी जैन ही कार चालवत होती, तर तिच्यासोबत तीन मैत्रीही कारमध्ये होत्या. या सगळ्या वांद्रे येथे जात असताना धारावीत हा अपघात झाला. ध्रुवी जैनने कार भाड्याने घेतली होती, अशी माहिती मिळते आहे. पोलिसांनी ध्रुवीला ताब्यात घेतल्यानंतर तिने आपली चूक मान्य केली. पोलिसांनी ध्रुवीला अटक करुन, तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरुणी मद्यधुंद अवस्थेत होती, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. मात्र तरुणीच्या वैद्यकीय तपासणीत काहीही निष्पन्न न झाल्याने तिला जामीन देण्यात आला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























