(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संपूर्ण भारतीय बनावटीच्या विमानाची चाचणी यशस्वी, कॅप्टन अमोल यादव यांचं स्वप्न पूर्ण
भारतासाठी आणि मराठी माणसांसाठी अभिमानास्पद अशी बातमी आहे. कॅप्टन अमोल यादव यांनी अथक परिश्रमाने बनवलेल्या विमानाची टेक ऑफ आणि लॅण्डिंग चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.
मुंबई : सध्या 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया'वर भर दिला जात आहे. अशावेळी भारतासाठी आणि मराठी माणसांसाठी अभिमानास्पद अशी बातमी आहे. अमोल यादव यांनी अथक परिश्रमाने बनवलेल्या विमानाची टेक ऑफ आणि लॅण्डिंग चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता आणखी दोन चाचण्या शिल्लक आहे. त्या झाल्या की विमान सेवेत रुजू होईल. आज म्हणजेच स्वातंत्रदिनी स्वत: अमोल यादव यांनी याबाबत घोषणा केली.
विमान तयार झाल्यावर डीजीसीएच्या परवानगीसाठी लागलेला वेळ आणि या प्रक्रियेनंतर विमानाला विमा संरक्षण मिळाल्यानंतर कॅप्टन अमोल यादव यांनी विमानाची यशस्वी चाचणी केली. विमानाची टेक ऑफ आणि लॅण्डिंग चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुढची चाचण पूर्ण सर्किटची असेल. त्यानंतर एका विमातळापासून दुसऱ्या विमानतळावर अशी दुसरी चाचणी असेल. त्यानंतर हे विमान सेवेत रुजू होईल, असं अमोल यादव यांनी सांगितलं.
गच्चीवर विमानाची निर्मिती कॅप्टन अमोल यांनी आपल्या चारकोप येथील इमारतीच्या गच्चीवर या विमानाची निर्मिती केली आहे. तर वांद्रे इथल्या 'मेक इन इंडिया' प्रदर्शनात या विमानाचं दर्शन घडवलं होतं. तसंच भारतात बनवलेलं हे पहिलं कमर्शियल एअरक्राफ्ट आहे. पुढच्या काही दिवसात ते आकाशात झेपावणार आहे.
संघर्षानंतर डीजीसीएकडून परवानगी मराठमोळे वैमानिक अमोल यादव यांची मेहनत आणि संघर्ष अखेर फळाला आला आहे. मेक इन इंडिया अंतर्गत बनवलेलं पहिलं मेड इन इंडिया 6 सीटर विमानाला आज (19 ऑक्टोबर) डीजीसीएकडून प्रमाणपत्र मिळालं आहे. कॅप्टन अमोल यादव यांनी 19 वर्षांच्या मेहनतीने हे विमान तयार केलं आहे. आता ते उड्डाण आणि चाचणीसाठी तयार आहे. एखाद्या भारतीयाने बनवलेल्या विमानाला 'स्पेशल परमिट टू फ्लाय'चं प्रमाणपत्र मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं अमोल यादव यांनी सांगितलं.
विमानाचं नाव काय? "भारतातील विमानं VT ने रजिस्टर होतात. त्यानंतरची तीन अक्षरं आवडीनुसार ठेवण्याची मुभा असते. 2011 मी नोंदणीसाठी अर्ज केला होता. परंतु नोंदणीच्या कामात दिरंगाई, ढिसाळपणा दिसला. यामुळे देशाचं बरंच नुकसान झालं होतं. हे विमान 2016मध्ये मेक इन इंडियामध्ये सादर केलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला, सहकार्य केलं. त्यांच्यामुळे देशाचं मोठं नुकसान टळलं. त्यामुळे विमानाच्या नावातील NMD हे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचं कॉम्बिनेशन आहे," असं अमोल यादव यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
19 वर्षांच्या मेहनतीला यश, अमोल यादव यांच्या विमानाच्या उड्डाणाचा मार्ग मोकळा
अमोल यादवांच्या विमान कारखान्यासाठी पालघरमध्ये जागा मिळणार!
विमानाची पहिली सफर आई-वडिलांना घडव, राष्ट्रपतींचा अमोल यादव यांना सल्ला
अमोल यादवांच्या विमानाचं नाव व्हीटी-नरेंद्र मोदी देवेंद्र'!
अमोल यादवांच्या सहाआसनी स्वदेशी विमानाचं अखेर रजिस्ट्रेशन
Caption Amol Yadav यांचं स्वप्न पूर्ण; संपूर्ण भारतीय बनावटीच्या विमानाची चाचणी यशस्वी