एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

भारतीय कंपनीला डावलून दिल्ली-मेरठ मेट्रोच्या कामाचं चिनी कंपनीला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करा : जितेंद्र आव्हाड

भारत-चीन सीमावादावरुन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्राच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे. सोबतचं भारतीय कंपनीला डावलून दिल्ली मेरठ मेट्रोच्या कामाचं चिनी कंपनीला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचे आव्हान केलंय.

मुंबई : भारत-चीन सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. काल झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. यावरुन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 12 जूनला दिल्ली मेरठ मेट्रोच्या कामात एल&टी या भारतीय कंपनीला डावलून चिनी 'शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनी'ला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करायला सांगा, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.

भारत-चीन सीमेवरुन दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या वादावरुन केंद्रातील सरकारवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? आत्मनिर्भरच्या गप्पा मारून झाल्यावर 12 जून 2020 ला दिल्ली मेरठ मेट्रोचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. हे कॉन्ट्रॅक्ट कुणी दिलं? रेल्वे कुणाच्या अखत्यारीत आहे? केंद्राच्या ना? त्यानंतर 15 जूनला चिन्यांनी आपल्या 20 जवानांना मारले. हे कसले बोंबलाचे परराष्ट्र धोरण? 12 जूनला दिल्ली मेरठ मेट्रोच्या कामात एल&टी या भारतीय कंपनीलाला डावलून चिनी 'शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनी'ला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करायला सांगा, असं आव्हान आव्हाड यांनी दिलं आहे. एकप्रकारे आत्मनिर्भर भारताची जरी घोषणा केली असली तरी कंत्राटं मात्र चिनी कंपनीला देत असल्याचा आरोप आव्हाड यांनी लावला आहे.

राहुल गांधी यांचीही केंद्रावर टीका जवानांना श्रद्धांजली वाहताना संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यात चीनचा उल्लेखही का नाही, असा प्रश्न काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झालेत. या घटनेवर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या रुपानं तब्बल 36 तासानंतर पहिली सरकारी प्रतिक्रिया आली. त्यावर राहुल गांधींनी पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. राजनाथ सिंह यांनी जवानांना श्रद्धांजली वाहणारं जे ट्विट केलं आहे, त्यात चीनचा उल्लेखही नसणं हा जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. जर खरोखर इतक्या वेदना झाल्या असतील तर अशी सुरुवात करुन राहुल गांधींनी पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यात त्यांचा पुढचा प्रश्न आहे की जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन दिवस का लागले? जवान शहीद होत असतानाही राजकीय सभा का सुरु ठेवल्या जातायत?

India-China Dispute | गलवान खोऱ्यात चिनी सैन्याकडून कट आखून हिंसाचार : भारत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?Maharashtra Exit Poll 2024 | विधानसभा निवडणुकीचा Exit Poll, कुणाला किती जागा मिळणार? ABP MajhaMaharashtra Exit Poll | महायुती 121, महाविकास आघाडीला 150 जागा मिळण्याची शक्यता ABP MajhaNitesh Karale Master : भर रस्त्यात मारहाण,मुलीलाही लागल; कराळे मास्तरांनी सांगितलं पूर्ण कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Exit Poll Result : शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
Embed widget