एक्स्प्लोर
दीपालीला न्याय द्या, सोशल मीडियावरुन मोहीम, ‘चेंज’वर पिटीशन
हिट अँड रनची बळी ठरलेल्या दीपालीला न्याय मिळावा म्हणून आता सोशल मीडियावर मोहीम सुरु करण्यात आली आहे. तसेच, ‘चेंज डॉट ऑर्ग’ या वेबसाईटवरुनही याचिका दाखल करुन दीपालीला न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
मुंबई : मरीन ड्राईव्हवरच्या सिग्नलवर भरधाव कारच्या धडकेत डॉ. दीपाली लहामटे गंभीररित्या जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हिट अँड रनची बळी ठरलेल्या दीपालीला न्याय मिळावा म्हणून आता सोशल मीडियावर मोहीम सुरु करण्यात आली आहे. तसेच, ‘चेंज डॉट ऑर्ग’ या वेबसाईटवरुनही याचिका दाखल करुन दीपालीला न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
सोशल मीडियावर मोहीम
डॉ. दीपाली लहामटेला न्याय मिळावा आणि हिट अँड रनसारख्या प्रकारात आणखी कुणाचा बळी जाऊ नये म्हणून सोशल मीडियातून मोहीम सुरु करण्यात आली आहे. #JusticeForDipali आणि #ThinkandDrive या हॅशटॅगच्या माध्यमातून न्यायाची मागणी केली जात आहे. या मोहिमेत सोशल मीडियावरील अनेकजण सहभागी झाले आहेत आणि मोहिमेचा आवाज बुलंद करत आहेत.
सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी आपापल्या भावना व्यक्त करत, हिट अँड रन प्रकाराविरोधात निषेध व्यक्त केला आहे. शिवाय, दीपालीला न्याय मिळायला हवा, अशी मागणी केली आहे.
‘चेंज’वरही पिटीशन
‘चेंज डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही दीपालीच्या न्यायासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या ‘ह्युमॅनिटी फर्स्ट फाऊंडेशन’चे कार्यकर्ते पंदारी शेट्टी यांनी ही पिटीशन इथे पोस्ट केली असून, हजारोंच्या पटीत नेटिझन्सकडून या पिटीशनला समर्थन मिळत आहे. आतापर्यंत साडेआठ हजारहून अधिक जणांनी या पिटीशनवर ऑनलाईन स्वाक्षरी केली आहे.
या पिटीशनची ‘चेंज डॉट ऑर्ग’वरील लिंक सोशल मीडियावर शेअर करुन, जास्तीत जास्त लोकांना स्वाक्षरी करण्यास आवाहन केले जात आहे.
एकंदरीत डॉ. दीपाली लहामटेला न्याय मिळावा, यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले जात आहेत.
नेमकी घटना काय आहे?
मुंबईत भरधाव कारच्या धडकेत जखमी होऊन मृत्यूशी झुंज देणाऱ्या डॉ. दीपाली लहामटेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
24 मार्च रोजी आपल्या भावाला डॉक्टर झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी चाललेल्या दीपालीला मरीन ड्राईव्हवरच्या सिग्नलवर शिखा जव्हेरी या तरुणीने भरधाव गाडीने धडक दिली. पण सुमारे 4 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर दीपालीची प्राणज्योत मालवली.
येत्या काही महिन्यातच दीपाली डॉक्टर होणार होती. पण या अपघातानं लहामटे कुटुंब पूर्णपणे उद्धवस्त झालं आहे. दीपालीच्या भावाने तिचे अवयव दान करणार असल्याचंही सांगितलं.
दीपाली लहामटे ही नायर रुग्णालयाच्या दंतमहाविद्यालयात इंटर्न म्हणून काम करत होती. दीपालीच्या एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलेल्या भावाचं जे.जे. जिमखान्यात कॉन्व्होकेशन होतं. त्यासाठी गेल्या शनिवारी, म्हणजे 24 मार्चला ती पायी चालली होती.
तारापोरवाला मत्स्यालयाजवळ असलेल्या सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर दीपाली रस्ता ओलांडत होती. त्यावेळी लाल सिग्नल असतानाही एका पांढऱ्या होंडा सिटी कारने सिग्नल तोडला आणि दीपालीला जोरदार धडक दिली.
एफआयआरमध्ये असलेल्या माहितीनुसार शीखा झवेरी नामक महिला संबंधित कार चालवत होती. नेपियन्सी भागात राहणारी शीखा शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. अपघाताच्या वेळी तिच्यासोबत गाडीत तिची धाकटी मुलगीही होती. दुर्दैवाने त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.
अपघातानंतर जखमी दीपालीला वैद्यकीय मदत करण्याऐवजी शीखाने पळ काढला. एका व्यक्तीने पाठलाग करुन तिला पुढच्या सिग्नलवर गाठलं.्
काही पादचाऱ्यांनी दीपालीला भाटिया रुग्णालयात दाखल केलं. गेल्या शनिवारपासून दीपाली लाईफ सपोर्ट सिस्टमवर होती. अखेर आज तिची प्राणज्योत मालवली. दरम्यान आरोपी महिलाचालक जामिनावर बाहेर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
बीड
राजकारण
Advertisement