एक्स्प्लोर
Advertisement
CAA Protest | मुंबईतील महिलांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस, विद्यार्थी नेता उमर खालिदचीही हजेरी
एकीकडे दिल्लीच्या शाहीनबाग परिसरात महिलांचे गेले काही दिवस सीएए आणि एनआरसीविरोधात अविरत आंदोलन सुरु असताना मुंबईतील महिलाही यातून प्रेरित होऊन रस्त्यावर उतरल्या आहेत. मुंबई सेंट्रल येथील नागपाडा विभागात रविवारी रात्रीपासून शेकडो महिलांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.
मुंबई : दिल्लीतल्या शाहीन बाग आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईच्या नागपाड्यातही सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलन सुरुच आहे. मुस्लीम महिलांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान या आंदोलनात काल (27 जानेवारी) रात्री विद्यार्थी नेता उमर खालिद सहभागी झाला होता. खालिदने आंदोलक महिलांचं कौतुक केलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. देशातून सीएए आणि एनआरसी जाईलच, परंतु महाराष्ट्रातून जशी भाजपची सत्ता गेली तशी सर्व देशातूनही भाजप सत्तेपासून पायउतार होईल, असं उमर खालिद म्हणाला.
नागपाड्यातल्या या आंदोलनात मुंबईतल्या विविध भागातून महिला सहभागी झाल्या आहेत. घरदार, संसार, मुलं हे सर्व सांभाळून या महिला पद्धतशीर नियोजन करुन नागपाड्यातल्या आंदोलनात सहभागी होत आहेत. आंदोलनाची तीव्रता पाहता मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. जोपर्यंत कायदा मागे घेतला जात नाही, तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरुच राहील असा निर्धार या महिलांनी केला आहे. हातात तिरंगा आणि फलक घेत या महिला केंद्र सरकारविरोधात घोषणा देत आहेत.
दिल्लीच्या शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईतही CAA, NRC विरोधात महिलांचा ठिय्या
शाहीन बाग परिसरात महिन्याभरापासून आंदोलन
दिल्लीत शाहीन बाग परिसरात दीड महिन्यापासून एक अभिनव आंदोलन सुरु आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात या परिसरातल्या महिला एकत्रित आल्या आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनात कुठलाही नेता नाही, त्यामुळे हे आंदोलन चर्चेचा विषय बनलं आहे. आपले घर सांभाळतानाच या महिला सरकारविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. दिल्लीतल्या थंडी, ऊन, वारा पावसाची पर्वा न करता हे आंदोलन सुरु आहे.
सीएए आणि एनआरसीविरोधात 300 कलाकारांचं खुलं पत्र
सीएए आणि एनआरसीविरोधात देशातील अनेक भागात निषेध होत आहे. बॉलिवूड कलाकारांनीही या कायद्याचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समर्थन केलं आहे. यात चित्रपट निर्माता मीरा नायर, नंदिता दास, अभिनेता नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, जावेद जाफरी, पार्थ चॅटर्जी, अनिता देसाई, किरण देसाई, टीएम कृष्णा, आशिष नंदी आणि गायत्री चक्रवर्तीसह 300 पेक्षा अधिक कलाकारांचा समावेश आहे. 300 पेक्षाही अधिक जणांची स्वाक्षरी असलेल्या कलाकारांनी खुलं पत्र देशातील जनतेला लिहिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement